पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी संपाची हाक दिल्यानंतरच २०१७ साली राज्यभरात शेतकऱ्यांचा ऐतिहासिक संप झाला होता. याच पुणतांबा गावातून आता ५ वर्षानंतर शेतकऱ्यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. राहाता तहसीलदारांना उद्या ठरावाचे निवेदन देण्यात येणार आहे. तसंच इतर ग्रामपंचायतींनी हे ठराव सरकारला पाठवावेत, असं आवाहन करण्यात आलं आहे.
पुणतांबा ग्रामसभेत झालेले ठराव :
– ऊस पिकाला एकरी १ हजार रूपये अनुदान द्यावे
– शिल्लक ऊस पिकाला हेक्टरी दोन लाख रूपये द्यावे
– कांद्यासह सर्व पिकांना हमीभाव द्यावा
– कांद्याला प्रती क्विंटल पाचशे रूपये अनुदान द्यावे
– शेतकऱ्यांना दिवसा पूर्ण दाबाने वीज मिळावी
– थकित वीजबिल माफ झाले पाहिजे
– कांदा आणि गव्हाची निर्यातबंदी उठवावी
– सर्व पिकांना आधारभूत किंमत दिली जावी, त्यासाठी आयोगाची स्थापना करून निर्णय घ्यावा
– २०१७ साली केलेल्या कर्जमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी
– नियमित कर्ज भरणारांचे अनुदान दिले जावे
– दुधाला उसाप्रमाणे एआरपी लागू केला जावा
– दुधाला कमीतकमी ४० रूपये दर दिला जावा
– खाजगी दूध संकलन केंद्रात होणारी लूट थांबवावी
– वन्य प्राण्यांमुळे नुकसान झाल्यास भरपाई दिली जावी
– शेतकरी आंदोलनात दाखल गुन्हे मागे घेतले जावे
– वन हक्क कायद्यानुसार आदिवासींना जमिनी नावावर करून द्याव्यात
कांद्याला मातीमोल भाव; शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी