महाराष्ट्र कोरोना रुग्णसंख्या: करोनाबाबत आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती, रुग्ण वाढत असल्याच्या चर्चेवर म्हणाले… – coronavirus update maharashtra today fourth wave is not possible said by health minister
नागपूर : राज्यात लसीकरणाचा चांगला परिणाम दिसत आहे. रोज २००-३०० करोनाबाधित समोर येत असले तरी चौथ्या लाटेबाबत काळजीचे कारण नाही आणि अशी लाट येण्याची सुतराम शक्यता नाही, असा विश्वास राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे.
राजेश टोपे यांनी सोमवारी नागपूरचा दौरा केला. ईडीच्या कोठडीत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली. देशमुख यांच्या काटोल मतदारसंघातील विविध प्रश्नांवर चर्चा केली आणि शहर व ग्रामीणच्या पदाधिकाऱ्यांशीही संवाद साधला. यानंतर पत्रकारांशी बोलताना टोपे यांनी चौथी लाट येण्याची शक्यता फेटाळून लावली. पोलीस कर्मचाऱ्याची वसाहतमध्येच आत्महत्या, सुसाईड नोटमधील कारण वाचून हादराल… सद्यस्थितीत १ हजार ९५० रुग्ण सक्रिय आहेत. राज्याने रोज ६५ हजार रुग्ण बघितले. त्यामुळे सध्याचे सक्रिय रुग्ण मोठा विषय वाटत नाही. केंद्राच्या सूचनेनुसार हेल्थ, फ्रंटलाईन आणि आवश्यक सेवा देणाऱ्यांना बुस्टर डोस दिला जात आहे. वृद्धांनाही देण्यात येत आहे. इतरांबाबत केंद्राने कुठल्याही सूचना केलेल्या नाही व सरकारही त्यासाठी आग्रही नाही. अँटीबॉडीजच्या टेस्ट करून आपआपल्या पद्धतीने डोसेज घेण्यात असल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.