लातूर : लग्न समारंभात जेवण करणाऱ्यांना विषबाधा झाल्याची घटना लातूरमध्ये समोर आली आहे. यामध्ये तब्बल २०० लोकांना विषबाधा झाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून त्रास होणाऱ्या नागरिकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
डॉक्टरांकडून आलेल्या माहितीनुसार, या वऱ्हाडी रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर संबंधीत उपचार सुरू आहेत. दरम्यान, या लग्नसोहळ्यात झालेल्या अन्न विषबाधेमुळे वऱ्हाडींना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. तर ही विषबाधा नेमकी कशी झाली? याचा पुढील तपास पोलीस करत असल्याची माहिती आहे.