मुंबई: प्रसाद ओक दिग्दर्शित आणि अमृता खानविलकर-आदिनाथ कोठारे यांच्या अभिनय कौशल्यानं खुललेला ‘चंद्र्मुखी‘ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या निमित्ताने विश्वास पाटील यांची ‘चंद्रमुखी’ ही कादंबरी पडद्यावर उतरली. एक अनोखी प्रेमकहाणी मोठ्या पडद्यावर अनेकांना भावली. तर एक भव्यदिव्य कलाकृती प्रेक्षकांनी अनुभवली आहे. या चित्रपटाचं झालेलं दिमाखदार प्रमोशन आणि चित्रपटानं केलेली कमाई उल्लेखनीय ठरत आहे.
Video: हादरवून टाकणारा ‘रानबाजार’चा ट्रेलर आला समोर
अमृतानं या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेतली होती. हा तिचा ड्रिम प्रोजेक्ट असल्याचं अनेकदा तिनं सांगितलं. प्रेक्षकांनी देखील अमृताच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक केलं आहे. बॉक्स ऑफिसवरही चित्रपटानं चांगली कमाई केली. त्यामुळं अमृता प्रचंड खूष आहे. तिनं प्रेक्षकांचे आभार तर मानलेच आहेत पण देवाचे आभार मानायला ती विसरली नाही.
निशाचे विवाहबाह्य संबंध, ‘तो’ माझ्याच घरी राहतोय; करण मेहराचे धक्कादायक खुलासे
दोन एक महिन्यांपासून अमृता ‘चंद्रमुखी’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र होती. अखेर आता ती काहीशी निवांत झाली आहे. चंद्रमुखीला मिळालेल्या यशाबद्दल देवाचे आभार मानायला ती तुळजापुर आणि अक्कलकोट इथं गेली होती. एक व्हिडिओ शेअर करत तिनं याबद्दल सांगितलं आहे.

‘लहानपणा पासून वर्षातुन एकदा अक्कलकोट आणि तुळजापूर ला यायची सवय आहे. स्वामींनी आणि आईनं खूप दिलंय. ‘चंद्रमुखी’ प्रदर्शित झाला . प्रमोशनच्या गडबडीत राहून गेलं होतं . आज फक्त आभार मानायला आले. बास बाकी काहीच नाही’, असं अमृतानं तिच्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here