काही दिवसांपूर्वी दिल्ली येथील एक इंजिनियर तरुण लोणावळा येथे फिरण्यासाठी आणि ट्रेकिंगसाठी आला होता. मात्र, यादरम्यान तो अचानक गायब झाला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून त्याचा शोध घेण्याचे काम स्थानिक पोलीस प्रशासन आणि रेस्क्यू टीम करत आहे. मात्र, तरीही त्याचा कोणताही तपास लागत नसल्याने सर्वजण चिंतेत आहेत.
प्रशासनाकडून शोध लागत नसल्याने तरुणाच्या वडिलांकडून एक पत्रक काढत नागरिकांना आवाहन केले काही की, ‘जो माझ्या मुलाला शोधून देईल, त्याला एक लाखाचं बक्षीस देण्यात येईल’. फरहाद अहमद असे गायब झालेल्या तरुणाचे नाव असून त्याला शोधा आणि एक लाख रुपये घेऊन जा. असे पत्रकच त्याच्या वडिलांनी काढले आहे.
हार्दिक पंड्या सावधान, राजस्थानचे हे पाच खेळाडू करू शकतात खेळ खल्लास
संबंधित तरुणाने बेपत्ता होण्याआधी आपल्या भावाला संर्पक करून ट्रेकिंगच्या जागेची माहिती देखील दिली असल्याचं समोर आलं आहे. मात्र, त्यानंतर या तरुणाचा फोन बंद झाला. तो अद्यापही बंद असून स्थानिक प्रशासन आणि रेस्क्यू टीमकडून त्याला शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. अद्यापही रेस्क्यू टीम, ड्रोन आणि स्थानिक प्रशासनाकडून डॉग स्कॉडच्या माध्यमातून शोधकार्य सुरू असल्याचे पोलीसांकडून सांगण्यात आले आहे.