मुंबई : घाटकोपर पूर्व मुंबई उपनगर येथील झवेरबेन पोपटलाल सभागृहात २५ मे 2022 ला सायंकाळी 6 वाजता ‘तृतीय रत्न’ या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. या नाट्यप्रयोगासाठी नि:शुल्क प्रवेश ठेवण्यात आला आहे. महात्मा ज्योतीबा फुले यांच्या शैक्षणिक ध्येयांनी प्रेरीत समाजिक विचारांचा प्रसार व्हावा आणि त्यांच्या समाज प्रबोधनासाठीच्या प्रयत्नांचे मोल कळावे या हेतूने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

मंत्री व इतर मागास बहुजन कल्याण विभाग तथा महाज्योतीचे अध्यक्ष श्री. विजय वडेट्टीवार, संचालक डॉ. बबनराव तायवाडे, प्रा. दिवाकर गमे, श्री. लक्ष्मण वडले यांनी महाज्योतीच्या वतीने राज्यातील विविध जिल्ह्यात महात्मा ज्योतीबा फुले लिखित ‘तृतीय रत्न’ नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे.

‘मुलाला शोधून द्या, एक लाखाचं बक्षीस देतो’, बेपत्ता मुलासाठी वडिलांची आर्त हाक
अनिरुद्ध वनकर यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले असून त्यांच्यासह ३० कलाकार व सहकाऱ्यांचा या नाटकात सहभाग असणार आहे. याआधी विविध जिल्ह्यात दहा प्रयोगाचे यशस्वी आयोजन करण्यात आलेले आहे. प्रेक्षक आणि माध्यमांकडून त्याला उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला आहे. सदर नाट्यप्रयोगास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीपकुमार डांगे, भा.प्र.से. यांनी केले आहे.

कर्जदारांना आणखी एक झटका लवकरच; RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिले ‘हे’ संकेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here