राज्य निवडणूक आयोगानं मुंबई महापालिका निवडणुकीच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मुंबई महापालिकेत चक्राकार पद्धतीनं आरक्षण सोडत जाहीर होण्याची ही चौथी वेळ आहे. १३ जूनला अंतिम आरक्षण सोडत प्रसिद्ध होईल.

हायलाइट्स:
- मुंबई महापालिकेचा आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर
- ३१ मे रोजी प्रारुप सोडत
- १३ जूनला आरक्षण सोडत प्रसिद्ध होणार
मुंबई महापालिकेचा आरक्षण सोडत कार्यक्रम कसा असेल?
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीसंदर्भातील पहिली नोटीस २७ मे रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. ३१ मे रोजी अनुसूचित जाती (महिला) आणि अनुसूचित जमाती (महिला) आणि सर्वसाधारण महिला आरक्षण सोडत काढली जाईल. ही आरक्षण सोडत १ जून रोजी वृत्तपत्रात प्रसिद्ध करुन हरकती मागवल्या जातील. आरक्षण सोडतीवरील हरकती आणि सूचना १ ते ६ जून दरम्यान स्वीकारल्या जातील. अंतिम आरक्षण सोडत १३ जून रोजी राजपत्रात प्रसिद्ध केली जाईल.
‘मुख्यमंत्री म्हणतील मी म्हणतो म्हणून नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा’, फडणवीसांचा हल्लाबोल
इतर १३ महापालिकांचा आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर
राज्यातील १४ महापालिकांचा पाच वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. मुंबई वगळता राज्यातील नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली आणि ठाणे या महापालिकांची मुदत संपली आहे. यामहापालिकांचा देखील आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
शिवसेना धक्कातंत्राच्या तयारीत, कोल्हापूरच्या कट्टर शिवसैनिकाचं नाव चर्चेत, संभाजीराजेंना शह?
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रक्रियेला वेग
सर्वोच्च न्यायालयानं जोपर्यंत ओबीसी राजकीय आरक्षणासाठी आवश्यक असलेली त्रिस्तरीय चाचणी होत नाही तोपर्यंत आरक्षण देता येणार नाही, असा आदेश दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महापालिका निवडणुकांच्या कामाला राज्य निवडणूक आयोगाकडून गती देण्यात येत आहे.
‘मध्य प्रदेश सरकारने दाखवून दिलं’; पंकजा मुंडेंचा ठाकरे सरकारवर निशाणा
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
Web Title : maharashtra state election commission declare bmc election reservation lottery programme check here
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network