वृत्तसंस्था, टोकयो :

मंकीपॉक्सच्या संसर्गात वाढ नाही, तसेच याप्रकरणी चिंता करण्याचे कारण नाही, असे प्रतिपादन अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी सोमवारी येथे केले. क्वाड परिषदेत सहभागी होण्यासाठी ते येथे आले असून, त्या दरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते.

मंकीपॉक्सचा संसर्ग काळजी करण्यासारखा आहे, असे विधान त्यांनी रविवारी केले होते. मात्र, सोमवारी त्यांनी हा निर्वाळा दिला. करोनाचा संसर्ग आपल्यासाठी ज्या प्रमाणात चिंताजनक होता, त्या तुलनेत हा आजार काळजी करण्यासारखा वाटत नाही. मंकीपॉक्समुळे विलगीकरणासारखी कठोर उपाययोजना लागू करण्याचीही गरज नाही, असे ते म्हणाले. स्मॉलपॉक्सवरील लस ही या संसर्गावरही प्रभावी ठरते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पेट्रोल, डिझेलच्या दराचा गोंधळ; राज्याच्या कपातीचा लाभ न झाल्याने ग्राहक संभ्रमात

मंकीपॉक्स हा आजार आफ्रिकेच्या बाहेर सहसा आढळत नाही. परंतु सद्यस्थितीत जगभरात त्याचे ८० रुग्ण आढळले आहेत. अमेरिकेत दोन रुग्ण आढळले असून, अन्य ५० रुग्ण संशयित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here