पुणे : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीवर पुन्हा एकदा अनेक गंभीर आरोप केले आहेत. ‘मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी हेमंत करकरे यांचा निकृष्ट जॅकेटमुळे मृत्यू झाला. शिवसेना नेते आणि मुंबई महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव हे विमल अग्रवाल यांचे पार्टनर होते. अग्रवाल यांचा बुलेटप्रूफ जॅकेट घोटाळा कुप्रसिद्ध आहे. कसाब प्रकरणानंतर हा घोटाळा उघडकीस आला,’ असं सोमय्या यांनी म्हटलं आहे.

शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करताना किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही लक्ष्य केलं आहे. ‘जाधव यांच्या ५३ इमारती आयकर विभागाने बेनामी संपत्ती म्हणून घोषित केल्या आहे. विमल अग्रवाल यांनी यशवंत जाधव यांच्याशी भागीदारी केली. समर्थ इरेक्टर्स आणि डेव्हलपर्स असं त्यांच्या कंपनीचं नाव आहे. या भागीदारी कंपनीने बद्री इन्फ्रा प्रोजेक्ट्सकडून ८० कोटी रुपयांची मलबार हिल येथील एक मालमत्ता विकत घेतली. विशेष म्हणजे समर्थ इरेक्टर्स आणि डेव्हलपर्सचे उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्याशी आर्थिक आणि व्यावसायिक संबंध आहेत. समर्थ इरेक्टर्स यांनी टीडीआरचे व्यवहार केले. उद्धव ठाकरे, यशवंत जाधव, बुलेटप्रूफ जॅकेट घोटाळ्यातील विमल अग्रवाल, श्रीधर पाटणकर यांचे आपआपसांत व्यावसायिक संबंध असल्याचं सिद्ध होत आहे,’ असा हल्लाबोल किरीट सोमय्यांनी केला आहे.

‘तेल लावलेल्या पैलवानाची गुडघ्यात अक्कल असलेल्या पैलवानासोबत युती’

हसन मुश्रीफही पुन्हा एकदा सोमय्यांच्या निशाण्यावर

राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी आरोपांची राळ उठवली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘हसन मुश्रीफ यांच्या बेनामी संपत्तीवर कायदेशीर कारवाई सुरू झाली आहे. बेनामी संपत्ती जप्त करण्याची कारवाई सुरू आहे,’ असं सोमय्या म्हणाले.

किरीट सोमय्या उचलणार मोठं पाऊल; राऊतांवर होणार गुन्हा दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here