मुंबई : अजय देवगण आणि काजोलची मुलगी नीसा आहे १९ वर्षांची. पण नीसा देवगण हिचे चाहतेही खूप आहेत. ती अजून सिनेमात आलेली नाही, पण नेहमीच ती प्रकाशझोतात असते. तिनं काही दिवसांपूर्वी गायिका कनिका कपूरच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीत नीसा गेली होती. पिंक बाॅडीकाॅन गाऊनमध्ये नीसा पार्टीत पोहोचली, तेव्हा तिच्यावरून कुणाचीही नजर हटत नव्हती. सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल झाले.

संगीतकार ए. आर. रहमान आता दिग्दर्शकाच्या खुर्चीत, चाहत्यांना सिनेमाची उत्सुकता

नीसा देवगणच्या पार्टीचे फोटो व्हायरल झाले आहेत. तिनं आपल्या मित्रमैत्रिणींसोबत पार्टीला हजेरी लावली होती. कनिका कपूरबरोबरही तिनं बऱ्याच पोजेस दिल्या.

लंडनमध्ये रंगली पार्टी
गायिका कनिका कपूरच्या रिसेप्शम पार्टीत तिचे फ्रेंड्स, कुटुंबीय सहभागी झाले होते. अजय-काजोलच्या मुलीबरोबर मित्र वेदांत महाजन आणि Orhan Awatramani होते. ही पार्टी लंडनमध्ये झाली.

नीसाचा बोल्ड लुक

नीसा देवगण

नीसाचा मित्र Orhan ने इन्स्टाग्रामवर रिसेप्शन पार्टीचे फोटो शेअर केले आहेत. गायक गुरू रंधावाही पार्टीत होता. फॅन्स नीसाच्या लुकवर खूश आहेत. त्यांचं म्हणणं की हा नीसाचा सर्वात बोल्ड लुक आहे.

कनिका कपूरचं दुसरं लग्न
कनिका कपूरचं हे दुसरं लग्न. तिचं पहिलं लग्न अगदी कमी वयात झालेलं. तिला तीन मुलंही आहेत. लग्नानंतर काही दिवसांनी ती मुंबईत परत आला आणि आपलं करियर केलं. कनिकानं दौतम हाथीरामसोबत दुसरं लग्न केलं.

केंद्र सरकारच्या या निर्णयावर भारावला सलमान खान, म्हणाला चुलबुल पांडेचं स्वप्न पूर्ण

अजय देवगण आणि काजोलनं १९९९ मध्ये लग्न केलं. दोघांना २००३ मध्ये नीसा झाली. तर नीसाचा भाऊ युगचा जन्म २०१० चा. काही दिवसांपूर्वी अजय देवगणला विचारलं होतं, नीसा सिनेमात येणार की नाही? त्यावर तो म्हणाला होता, मला माहीत नाही तिला यायचं आहे की नाही ते. सध्या तरी अभिनयात तिला फारसा रस दिसत नाही.

‘यहां पर सभी धंदा करता है’, रानबाजारचा बोल्ड ट्रेलर रिलीज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here