मुंबई- भारताचा मास्टरब्लास्टर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. बॉलिवूडमधील एखाद्या अभिनेत्री इतकीच साराची लोकप्रियता आहे. लाखो तरुणांची सारा ही क्रश आहे.

‘तारक मेहता…’मध्ये पुन्हा दिसणार दयाबेन! खुद्द निर्मात्यांनी दिली आनंदाची बातमी

आयपीएल २०२२ सुरू आहे. त्यात मुंबई इंडियन्सच्या मॅचला सारा आवर्जून उपस्थित रहायची. भलेही आयपीएलच्या यंदाच्या मौसमात मुंबई इंडियन्सनं खराब खेळ केला परंतु सारा प्रत्येकवेळी संघाला प्रोत्साहन देताना दिसली. सध्या सोशल मीडियावर साराच्या मराठमोळ्या साजची चर्चा आहे. साराचा आतापर्यंत कधीच कुणी न पाहिलेला मराठी लुक समोर आला आहे. यावेळी सारा पारंपरिक मराठमोळ्या वेशभूषेमध्ये दिसली. सारानं काठपदराची साडी नेसली होती, इतकंच नाही तर कपाळावर चंद्रकोरही होती. मराठमोळे दागिने, केसांत गजरा आणि नाकातल्या नथीने ती अतिशय सुंदर दिसत होती.

सचिन तेंडुलकर आणि त्याचं कुटुंबिय जवळच्या नातेवाईकांच्या लग्नसमारंभात सहभागी झाले होते. या लग्नसमारंभाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यातही साराच्या फोटोंना सर्वाधिक पसंती मिळत आहे. या लग्नसमारंभात सारा करवली होती असा अंदाज फोटोंवरून लावला जात आहे. कारण साडी नेसलेल्या साराच्या हातामध्ये मंगलकलश दिसत आहे. साराचा साडीमधील हा अंदाज तिच्या चाहत्यांना घायाळ करून गेला. साराचे साडीमधील फोटो पहिल्यांदाच समोर आले आहेत.

VIDEO: स्वामींनी आणि आईनं खूप दिलंय…अमृता पोहोचली तुळजाभवानीच्या दर्शनाला

सचिन तेंडुलकर

या लग्नसोहळ्यातील इतरही काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये साराचे पांढऱ्या रंगाचे ड्रेसमधील फोटोंचाही समावेश आहे. या फोटोंमध्ये देखील सारा खूपच सुंदर दिसत आहे. सोशल मीडियावर सध्या साराच्या साडीमधील फोटोंची जोरदार चर्चा सुरू आहे.

सारा तेंडुलकर

दरम्यान, मुंबईतील जे डब्ल्यू हॉटेलमध्ये झालेल्या या लग्नसोहळ्यात सचिन तेंडुलकरचे नवदांपत्याबरोबरचे फोटोही व्हायरल झाले आहेत. सचिननं यावेळी निळ्या रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाचा पायजमा घातला आहे. लग्नसोहळ्यातील काही विधींमध्ये सचिनदेखील सहभागी झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here