नागपूर: मेडिकल स्टोअर्समधून औषधांऐवजी बिअरची विक्री करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार सेंट्रल एव्हेन्यूवरील दोसरभवन चौकात उघडकीस आला. गणेशपेठ पोलिसांनी संबंधित मेडिकल स्टोअर्सवर छापा टाकून मालकाला अटक केली आहे. पोलिसांनी बिअरचा साठाही जप्त केला.

निशांत ऊर्फ बंटी प्रमोद गुप्ता (वय ३६, रा. दोसर भवन चौक) ,असे अटकेतील विक्रेत्याचे नाव आहे. बंटी याचे मेयो हॉस्पिटलजवळ कंचन मेडिकल स्टोअर्स आहे. तो बिअर विकत असल्याची महिती गणेशपेठ पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी मंगळवारी रात्री कंचन मेडिकल स्टोअर्सवर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी बिअरच्या ८० बाटल्या जप्त केल्या असून निशांत गुप्ताला अटक केली आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक एस. एस. कुमरे, सहाय्यक निरीक्षक रियाज मुलानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.

दरम्यान, राज्यात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनमधून जीवनावश्यक वस्तूंची विक्री, वाहतूक तसेच औषध दुकाने उघडी ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. या सवलतीचा गैरफायदा उठवत चक्क औषधांच्या दुकानातच बिअरची विक्री केली जात असल्याचे पाहून पोलीसही चक्रावले आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here