उमेदवारीचं तिकीट आणि छत्रपतींचा सन्मान या गोष्टी जोडायची गरज नाही. तिकीट हा वेगळा भाग आहे. कोणत्याही जातीधर्माच्या व्यक्तीच्या मनात शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्याविषयी प्रेमच आहे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले. सुधीर मुनगंटीवार यांच्या या वक्तव्याचे आता राजकीय वर्तुळात काय पडसाद उमटणार, हे पाहावे लागेल.
संभाजीराजे छत्रपती नेमकं काय म्हणाले?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी माझी सविस्तर चर्चा झाली आहे. आमच्यात बोलणं झालं आहे. पुढे काय करायचंय तेदेखील ठरले आहे. उद्धव ठाकरे त्याप्रमाणेच वागतील, असा मला विश्वास आहे. मुख्यमंत्री छत्रपती घराण्याचा सन्मान करतील, असे संभाजीराजे यांनी सांगितले.
शिवसेनेची भूमिका काय?
संजय राऊत यांना संभाजीराजे छत्रपती यांच्या वक्तव्याबद्दल विचारण्यात आले. त्यावर संजय राऊत यांनी म्हटले की, आम्ही नक्कीच छत्रपती घराण्याचा मान राखू. त्यामुळेच आम्ही संभाजीराजे यांना उमेदवारी देण्यासंदर्भात प्रस्ताव दिला होता. सध्यातरी यावर मी एवढंच बोलू शकेन. पण राज्यसभेच्या सहाव्या जागेवर शिवसेनेचाच उमेदवार असेल, ही भूमिका संजय राऊत यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केली.
शिवसेना संभाजीराजेंना संधी देणार? संभाजीराजेंकडून मुख्यमंत्र्याच्या कोर्टात चेंडू