मुंबई: मराठी मालिका सृष्टीतील अभिनेत्री मृणाल दुसानीस हिनं काही महिन्यांपूर्वी एका चिमुकलीला जन्म दिला. आई झालेल्या मृणालनं तिचा आनंद अनेकदा सोशल मीडियावर शेअर केला. मृणालनं आई झाल्याची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. पण तिच्या लेकीचा फोटो मात्र तिनं शेअर केला नव्हता. त्यामुळं तिच्या लेकीचा फोटो पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते.
मृणालनं नुकताच तिच्या लेकीचा फोटो शेअर केला आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. मृणालनं तिच्या मुलीचं नाव ‘नुरवी’ असं ठेवलंय. मृणाल सध्या आपल्या मातृत्वाचा पुरेपूर आनंद घेताना दिसते. लेक आयुष्यात आली अन् आयुष्य बदललंय, असं तिनं तिच्या एका पोस्टमध्ये म्हटलं होतं. हॉट सीनमुळे चर्चेत होती ही मराठमोळी अभिनेत्री, तुम्ही ओळखलं का?
लेक आयुष्यात आली अन् आयुष्य बदललंय, असं तिनं तिच्या एका पोस्टमध्ये म्हटलं होतं. या पोस्टमध्ये तिनं आपल्या पतीचा आणि लेकीचा एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत मृणालचा पती लेकीला खेळवताना दिसतोय. मृणालनं पोस्ट शेअर करताना एक सुंदर कॅप्शनही लिहिलं होतं. ‘आणि शेवटी नीरज बोलता झाला…नाहीतर घरात मी नाही बोलले तर कुणीच बोलत नाही.. भयंकर शांतता…पण आता सगळं बदलतं’ मला कपडेच काढायचे असते तर…’रानबाजार’मधील सीनवर तेजस्विनी स्पष्टच बोलली
मृणालच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ यांसारख्या अनेक मालिकांमधून तिनं प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. यशाच्या शिखरावर असताना मृणालनं २०१६ मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर नीरज मोरे याच्यासोबत अरेंज मॅरेज केलं. त्यानंतर ती आता अमेरिकेत वास्तव्यास आहे.