parbhani news today: लग्नमंडपात गाणं गात असताना महिलेचा अचानक गेला जीव, क्षणभरात असं काय घडल? – woman dies suddenly while singing in wedding parbhani news
परभणी : परभणी इथल्या पाथरी रोडवरील एका मंगलकार्यालयात शुक्रवारी २० मे रोजी लग्न सोहळा सुरू होता. यात सुमधुर आवाजात गाणे म्हणणाऱ्या संगीता गव्हाणे या महिलेचा हृदय विकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्या परभणी इथे होमगार्ड दलात कार्यरत होत्या. त्यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाथरी रोडवरील एक लग्नसोहळा पार पडत असताना यजमान मंडळीसह वऱ्हाडी, नातेवाईक, आप्तेष्टांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. लग्नाचा मुहूर्त जवळ आला होता. अगदी ढोलताशेही वाजत होते. यावेळी सोहळ्यात सहभागी झालेल्या संगीता यांना गाणं म्हणण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी बँन्डच्या संचालकाकडून माईक घेतला आणि आपल्या सुरेल आवाजात गाणं म्हणायला सुरुवात केली. सिलेंडरमधून गॅस गायब करणारी टोळी पुणे पोलिसांच्या हाती, गॅस चोरीची अनोखी शक्कल पाहाच… यावेळी संगीता गाण्याचा आनंद लुटत असताना अचानक असं काही घडलं की संपूर्ण कार्यालयात एकच गोंधळ उडाला. गाणं गात असतानाच त्या अचानक खाली कोसळल्या आणि सगळ्यांचीच धावपळ झाली. त्यांना उठवण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, त्या निपचित पडल्या होत्या. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. पण क्षणात होत्याचं नव्हतं झालं. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.