पुणे : लोणावळा येथे ट्रेकिंगसाठी आलेला तरुण गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता झाला होता. त्यानंतर त्याच्या शोधासाठी स्थानिक पोलीस प्रशासन आणि रेस्क्यू टीमने त्याच्या शोधासाठी कार्य सुरू केले होते. मात्र, त्या तरुणाचा मृतदेह सापडला असल्याची माहिती समोर येत आहे. एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली असून मृतदेह वर काढण्याचे काम सुरू आहे.

दोन दिवसांपासून होता बेपत्ता…

२० मे पासून हा तरुण लोणावळा परिसरात ट्रेकिंगसाठी आला होता. ट्रेकिंगचा अगोदर त्याने भावाला फोन केला होता. त्यानंतर त्याचा फोन बंद झाला होता. तेव्हापासून त्याचा शोध सुरू होता. मूळचा दिल्लीचा असलेला फरहाद अहमद तो कामनिमित्त कोल्हापूरला आला होता. त्यानंतर तो लोणावळा येथे ट्रेकिंगसाठी आला होता. फरहाद अहमदच्या वडिलांनी त्याच्या शोध घेण्यासाठी एक लाखांचे बक्षीसही ठेवले होते. मात्र, त्याचा मृतदेह सापडला असून तो मृत झाल्याची माहिती समोर येत आहे. एनडीआरएफचे पथक मृतदेह बाहेर काढण्याचे काम करण्याचे काम सुरू आहे.

राज्यसभेच्या सहाव्या जागेचा सस्पेन्स कायम, घडामोडींना वेग; संभाजीराजे मुंबईच्या दिशेने रवाना
तरूणाचा सापडला मृतदेह…

संबंधित तरुणाने बेपत्ता होण्याआधी आपल्या भावाला संपर्क करून ट्रेकिंगच्या जागेची माहिती देखील दिली होती. मात्र, त्यानंतर या तरुणाचा फोन बंद झाला. तो बंद असून स्थानिक प्रशासन आणि रेस्क्यू टीमकडून त्याला शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. मात्र, नियतीला हेच मान्य होत. दोन दिवसांपासून बेपत्ता असलेला तरूणाचा आदज मृतदेह सापडला आहे. या घटनेनंतर फरहादच्या कुंटूंबाला धक्का बसला आहे.

‘भारतीय संघाचा विचार करत नाही फक्त क्वॉलिफायरवर फोकस’; अनुभवी खेळाडूची मोठी प्रतिक्रिया

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here