‘कान्स’ महोत्सवाच्या रेड कार्पेटवर जाणाऱ्या कलाकारांची जगभरात चर्चा होते. यंदा या महोत्सवात दीपिका परीक्षक म्हणून चमकतेय. तिनं तिथले अनेक फोटो शेअर केले आहेत. दीपिका वेगवेगळ्या लुकमध्ये कान्सच्या रेडकार्पेटवर दिसली. जितकी चर्चा दीपिकाच्या लुकची झाली, त्याहून अधिक चर्चा तिचे कपडे आणि दागिन्यांच्या किंमतीची झाली.
दीपिकाचा एक खास लुक सध्या चर्चेत आलाय. काळ्या रंगाच्या ब्लेजर ड्रेसमध्ये दीपिकाचा लुक चाहत्यांना आवडतोय. त्यासोबतच तिनं गळ्यात एक हटके आणि आकर्षक असा नेकलेस घातलाय. हा नेकलेस सध्या चर्चेत आलाय. कारण म्हणजे या नेकलेसची किंमत.
दीपिकानं गळ्यात घातलेल्या या नेकपीसची (चोकर)ची किंमत काही लाखांमध्ये नाही तर कोटींमध्ये आहे. १८ कॅरेट सोनं आणि हिऱ्यांचा वापर करुन हा नेकलेस तयार करण्यात आलाय. या नेकलेसची किंमत तब्बल चार कोटी ४८ लाख असल्याचं समोर आलं आहे.