चिपळूण : मंगळवारी सायंकाळी चिपळूण खेड परिसरात झालेल्या वादळी पावसात पिंपळी येथे वीज कोसळून एका तरुणाचा मृत्यू झाला. संतोष झुझम असे या तरुणाचे नाव आहे.

चिपळूण आणि खेड परिसरात मंगळवारी संध्याकाळी गारांचा वर्षाव झाला. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला. मात्र, सागरी पट्ट्यात खाडीकाठी असणाऱ्या आंब्याच्या बागांचे सोसाट्याचा वारा तसेच गारांच्या तडाख्यामुळे मोठे नुकसान झाले. चिपळूणजवळच्या भिले, केतकी, मालदोली भागात मोठ्या प्रमाणात गारा पडल्या. खाडीकाठचा आंबा पूर्ण तयार झाला आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे वाहतूक सुरळीत नसल्याने तसेच, कामगारवर्ग उपलब्ध नसल्याने तो अजून झाडावरच आहे.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here