खंडवा: मध्य प्रदेशच्या खंडवा जिल्ह्यात भिक्षा मागणाऱ्या एका साधूला करण्यात आली आहे. साधूच्या जटा कापून शिवीगाळ करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावर घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आरोपीनं साधूच्या कानशिलात लगावल्या. त्यानंतर जबरदस्तीनं त्याच्या जटा कापण्यात आल्या. पोलिसांनी आरोपीला केली आहे.
आदिवासी बहुल खालवा ठाण्याच्या हद्दीत साधूला मारहाण झाली. रविवारी दुपारी हा प्रकार घडला. एका तरुणानं भिक्षा मागणाऱ्या साधूला पकडलं आणि मारहाण सुरू केली. मारहाण करता करता आरोपी त्या साधूला रस्त्याच्या कडेला असलेल्या सलूनमध्ये घेऊन गेला. तिथे असलेली कात्री घेऊन त्यानं साधूच्या जटा कापल्या. प्रवीण गौर असं आरोपीचं नाव आहे. त्याचे वडील हॉटेल व्यवसायिक आहेत.
कोण होता, त्याच्यासोबत नेमका काय वाद झाला, मारहाण आणि जटा कापण्यामागे काय कारण होतं, या प्रश्नांची उत्तरं अद्याप तरी मिळालेली नाहीत. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याची दखल घेतली. या प्रकरणी पोलिसांना तक्रार मिळालेली नाही. मात्र त्यांनी व्हिडीओच्या आधारे गुन्हा नोंदवला आणि आरोपीला अटक केली. त्याची चौकशी सुरू आहे. पीडित साधूचा शोध सुरू आहे.