गडचिरोली जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्र राज्याच्या शेवटच्या टोकावर आणि तीन राज्यांच्या सीमेवर असलेल्या सिरोंचा तालुक्यात आज २४ मे रोजी ४ वाजताच्या सुमारास अचानक चक्रीवादळ व अवकाळी पावसाचं आगमन झालं. यात लोकांना काही कळायच्या आधीच या चक्रीवादळाने रौद्ररूप धारण करून होत्याचं नव्हतं केलं. जवळपास २० ते ३० मिनिट चक्रीवादळ सुरू होतं. त्यात अनेक घरांवरचे छप्पर उडाले, रस्त्यावरील शेड उडाले, मोठ्या प्रमाणात झाडे कोसळली. एवढेचं नाही तर सिरोंचा तालुका मुख्यालयात असलेले पेट्रोल पंपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
सध्या चक्रीवादळ आणि पाऊस थांबले असले तरी तालुका मुख्यालयसह आणखी बरेच गावात नागरिकांचे खूप मोठे नुकसान झाल्याचं बोललं जात आहे. नेमकं किती नुकसान झालं हे अद्याप कळू शकले नाही. मात्र, जिल्ह्यातील केवळ सिरोंचा तालुक्यात अवकाळी पावसाचा खूप मोठा फटका बसल्याचं दिसून येत आहे.
चक्रीवादळाने बत्ती गुल…
अचानक आलेल्या चक्रीवादळाने सिरोंचा तालुक्यातील बहुतांश गावात मोठे नुकसान झाले. ठिकठिकाणी विजेच्या तारांवर मोठमोठे झाड कोसडल्याने सध्या तालुक्यात पुर्णपणे बत्ती गुल झाली आहे.
कालच हवामान खात्याने दिला होता इशारा…
भारतीय हवामान विभाग नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या हवामान अंदाजानुसार गडचिरोली जिल्ह्यात काही भागात दिनांक २३ ते २७ मे २०२२ या कालावधीत एक दोन ठिकाणी मेघगर्जनासह वादळ आणि खूप हल्का सरींचा पाऊस, वज्राघात इत्यादी होण्याची शक्यता वर्तविलेली आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी विशेषत: शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
तुमच्या टीव्हीवर देखील घेऊ शकता युट्यूब व्हिडिओचा आनंद, जाणून घ्या ही सोपी प्रोसेस