बीड : एचआयव्ही ग्रस्तांना नेहमीच समाजातील दुर्लक्षित घटक म्हणून पाहिलं जातं. बीडमध्ये मात्र अशा सात जोडप्यांना एकत्र आणून जिल्हा प्रशासन आणि सामाजिक संघटनांनी सामूहिक विवाह सोहळा घडवून आणला आहे. त्यामुळे व्यथित होऊन निराशामय जीवन जगणाऱ्या एचआयव्ही ग्रस्तांना कायमस्वरूपी आधार मिळाला आहे. यामध्ये लक्षवेधक क्षण म्हणजे, जिल्हा प्रशासनाने या जोडप्यांचं कन्यादान केलं.
विशेष बाब म्हणजे आकर्षण म्हणलं तर बीड जिल्ह्यातले मोठमोठे अधिकारी या विवाहाला उपस्थित असल्याने विवाहित जोडप्यांना देखील आपले नवीन आयुष्य सुरुवात करण्यास एक मोठे प्रोत्साहन मिळालं आहे.