चंद्रपूर : जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात फिरायला आलेल्या पर्यटकांनी एक अनोखी घटना पाहिली. ती म्हणजे, वाघाच्या बछड्याने अस्वलीचा रस्ता रोखल्यावर संतापलेले अस्वल त्या वाघाच्या बछड्याच्या मागे धावताना दिसले. अस्वलाचा रुद्रावतार पाहून वाघ बछड्याने जंगलात धूम ठोकली. एरवी जंगलाचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या वाघालाही संतापलेल्या अस्वलापुढे माघार घ्यावी लागली. वन्यजीव विश्वातील अशा गमती-जमती ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीव अशा श्रीमंतीचे दर्शन घडवितात.

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांनी एक अनोखी घटना पाहिली. वाघाच्या बछड्याने अस्वलाचा रस्ता अडवल्यानंतर संतापलेल्या अस्वलाचा व्हिडिओ वायरल झाला आहे. यानंतरची प्रतिक्रिया म्हणजे टी 19 वाघ बछड्याच्या मागे अस्वल धावले आणि अस्वलाचा रुद्रावतार पाहून वाघ बछड्याने जंगलात धूम ठोकली. एरवी जंगलचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या वाघालाही संतापलेल्या अस्वलापुढे माघार घ्यावी लागली. वन्यजीव विश्वातील अशा गमती-जमती पर्यटकांना ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीव श्रीमंतीचे दर्शन घडवितात

दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यात वाघ-मानव संघर्षाने टोक गाठले आहे. अलिकडील काळात वन्यजीवांचे हल्ले वाढले आहेत. त्यात तेंदुपत्ता संकलन सुरू असून मजूर मोठ्या प्रमाणावर तेंदुची पाने तोडायला जंगलात जात आहेत. तेंदु हंगामादरम्यान वाघाच्या हल्याच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात येणाऱ्या केवाडा येथील विकास जाभुळकर आणि त्यांचा पत्नी मिना जाभुळकर तेंदु संकलनासाठी जंगलात गेले. तेंदु संकलन करीत असताना वाघाने हल्ला केला. या हल्यात मीनाबाई जांभुळकर यांच्या घटनास्थळीच मृत्यू झाला. तर विकास जांभुळकर हा बेपत्ता आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here