मुंबईत धक्कादायक घटना घडली आहे. शाळेच्या आवारात एका लहान मुलीवर बलात्कार झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीलाही अटक केली आहे.
धक्कादायक घटना, मुंबईत शाळेच्या आवारात लहान मुलीवर बलात्कार
मुंबई : शाळेच्या परिसरात असलेल्या मैदानात खेळण्यासाठी गेलेल्या पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना मुलुंडच्या नवघर येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी शाळेच्या ५१ वर्षीय सुरक्षारक्षकाला अटक केली आहे. शाळेजवळच राहणारी ही मुलगी सोमवारी मैदानात खेळायला गेली असताना सुरक्षारक्षकाने चॉकलेटचे आमिष दाखवून तिला निर्मनुष्य ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. मुलीने घडलेला सर्व प्रकार सांगितल्यानंतर तिच्या आईने नवघर पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी पोक्सो, बलात्काराचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आणि सुरक्षारक्षकाच्या मुसक्या आवळल्या.