वॉशिंग्टन : अमेरिकेतील टेक्सास येथील शाळेत गोळीबार (Firing In School) करण्यात आल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात १८ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून तीन शिक्षकांनीही आपले प्राण गमावले आहेत. तसंच पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत १८ वर्षीय हल्लेखोर तरुण ठार झाला आहे. या घटनेबाबत टेक्सासचे गव्हर्नर ग्रेह एबॉट यांनी माहिती दिली. शाळेत घडलेल्या या भीषण घटनेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘रॉब एलिमेंट्री स्कूल’ असं गोळीबार झालेल्या शाळेचं नाव असून हल्लेखोर तरुण याच शाळेचा माजी विद्यार्थी आहे. शाळेतील विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्याआधी तरुणाने आपली गाडी शाळेबाहेरच लावली होती. त्यानंतर शाळेत घुसून अंदाधुंद गोळीबार सुरू केला. हल्लेखोराजवळ एक हँडगनही आढळली आहे.

संभाजीराजेंना पाठिंबा द्यायचा की नाही? भाजपश्रेष्ठींनी देवेंद्र फडणवीसांना सर्वाधिकार दिल्याची चर्चा

शाळेवरील हल्ल्यानंतर जो बायडन काय म्हणाले?

टेक्सास प्रदेशात घडलेल्या हल्ल्यानंतर जो बायडन यांनी प्रतिक्रिया देत दु:ख व्यक्त केलं आहे. ‘आपण कधीपर्यंत देवाच्या नावावर बंदूक घेणार आहोत, हे स्वत:ला विचारणं गरजेचं आहे. जे आई-वडील आता कधीही आपल्या मुलांना पाहू शकणार नाहीत, त्यांचा विचार करणं गरजेचं आहे. आता कडक कारवाई करण्याची वेळ आली असून जे लोक कायदा मोडून हातात बंदूक घेतात, त्यांना आम्ही माफ करणार नाही,’ असं बायडन यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अमेरिकेत घडलेल्या या घटनेनंतर जगभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here