वृत्तसंस्था, नवी दिल्ली :
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्या ठावठिकाण्याबाबत सातत्याने वेगवेगळी वृत्ते प्रसिद्ध होत असताना, दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानात कराचीत असल्याचे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आपल्या आरोपपत्रात नमूद केले असून, त्यासाठी दाऊदच्या भाच्याची साक्ष ईडीने काढली आहे.
काळे पैसे पांढरे करण्याच्या गैरव्यवहारप्रकरणी ईडीने मुंबईतील न्यायालयात नुकतेच एक आरोपपत्र दाखल केले. यात दाऊद हा एक आरोपी असून, तो कराचीत वास्तव्यास असल्याचे नमूद केले आहे. दाऊदची बहीण हसिना पारकर हिचा मुलगा अलिशाह याची ईडीने गेल्या फेब्रुवारीत कसून चौकशी केली. त्या चौकशीदरम्यान दाऊद पाकमध्ये असल्याचे अलिशाहने सांगितले होते. तसेच, आपण दाऊदच्या संपर्कात नाही, असा दावाही त्याने चौकशीत केला होता.

ईडीने आपल्या आरोपपत्रात अलिशाहचे हे म्हणणे पुरावा म्हणून जोडले आहे. दाऊदने भारत सोडल्यानंतर हसिना पारकर व आपल्या इतर हस्तकांकरवी भारतातील गुन्हेगारी कारवायांचे नियंत्रण दाऊद करीत आहे, असे ईडीने आरोपपत्रात नमूद केले आहे.
ना पश्चाताप, ना उपरती… १४ दिवसांची कोठडी सुनावल्यानंतरही हसत हसत केतकी न्यायालयाबाहेर