दुबईः संयुक्त अरब अमीरातमध्ये (UAE) मंगळवारी मंकीपॉक्स संसर्गाचा पहिला रुग्ण सापडला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार पश्चिम अफ्रीकातून आलेल्या महिलेला मंकीपॉक्सची लागण झाली आहे. दरम्यान, मंकीपॉक्सचा फैलाव २० देशांत झाला असून १००हून जास्त रुग्ण सापडले आहेत. त्यामुळं आता भारतानाही सावध राहण्याची आवश्यकता असल्याचं तज्ज्ञांचे मत आहे.

करोनानंतर मंकीपॉक्स या रोगाचा जगभरात फैलाव होत असल्याने चिंता वाढली आहे. ब्रिटनसह युरोपीय देशांनंतर आता अमिरेकेतही अलर्ट जारी करण्यात आलं आहे. युएईमध्ये मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळल्याने खळबळ माजली आहे. युएईच्या आरोग्य प्रशासनाने रुग्णाबाबत अधिक माहिती दिली नाहीये. मंकीपॉक्सची लागण झालेली महिल्याची चाचणी करण्यात आली असून नमुन्याची तपासणी करण्यात येत आहे. मंकीपॉक्सचा फैलाव होणार नाही यासाठी आम्ही कठोर पावलं उचलत आहोत, असं प्रशासनाने म्हटलं आहे. तसंच, युएई प्रशासनाने हा रुग्ण कोणत्या शहरात आढळला आहे, हे मात्र अद्याप स्पष्ट केलं नाहीये.

जगभर धुमाकूळ घालणारा मंकीपॉक्स व्हायरस आहे तरी काय?; समलैंगिकांना अधिक धोका?
इस्त्रायलमध्येही मंकीपॉक्सचा रुग्ण

मंकीपॉक्स या आजाराने जगभरात धुमाकुळ घातलं आहे. मध्य आणि पश्चिम अफ्रीकेत मंकीपॉक्सचा प्रसार अधिक होता. ब्रिटेन, स्पेन, पोर्तुगाल, इटली, युएस, स्वीडन, आणि कॅनडात या रोगाचा शिरकाव झाला आहे. तर, तरुणांना मंकीपॉक्सची लागण होण्याचे प्रमाण अधिक आहे. विशेष म्हणजे मंकीपॉक्सची बाधा झालेल्या रुग्णांमधील एकही रुग्णांने अफ्रीकेचा प्रवास केला नाहीये. त्यामुळं चिंता अधिक वाढली आहे.

मंकीपॉक्स म्हणजे काय?

मंकीपॉक्स हा अतिशय दुर्मिळ आजार आहे. देवीचा रोग ज्या विषाणूमुळं होतो त्याच विषाणूचा हा एकप्रकारे उपप्रकार आहे, असं म्हणायला हरकत नाही. संसर्ग झालेल्या रुग्णाशी जवळचा संबंध आल्यास हा रोग वेगाने पसरतो. हा विषाणूचा त्वचा, श्वसनलिका, डोळे, नाक किंवा श्वसनावाटे संसर्ग होऊ शकतो.

वाचाः अमेरिकेत आढळला ‘मंकीपॉक्स’चा रुग्ण; ‘या’ देशातून संक्रमित झाल्याची शक्यता

मंकीपॉक्सवर उपचार काय?

सध्या या आजारावर कोणताही इलाज उपलब्ध नाही. परंतु हा आजार रोखण्यासाठी स्मॉल पॉक्स वॅक्सिन, अँटीव्हायरल आणि व्हीआयजी यांचा वापर केला जाऊ शकतो. आम्‍ही तुम्‍हाला सांगू की स्‍माल पॉक्‍स लस मंकीपॉक्‍स रोखण्‍यासाठी 85 टक्के प्रभावी ठरली आहे. मंकीपॉक्सवर अद्याप कोणताही सुरक्षित आणि सिद्ध उपचार नाही.

वाचाः डझनभर देशांत मंकीपॉक्सचा फैलाव; भारतात पसरणार? तज्ज्ञ म्हणतात…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here