मुंबई : द कपिल शर्मा शोमध्ये सगळ्यांना आपल्या विनोदानं हसवणारी काॅमेडी क्वीन आणि अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. गेले काही दिवस तिच्या लग्नाच्या बातम्या समोर येत होत्या. असं म्हणतात ती सम्राट मुखर्जीबरोबर लग्न करणार आहे. सम्राट शरबानी मुखर्जीचा भाऊ आहे. काजोल, राणी मुखर्जी, तनिषा आणि अयान मुखर्जीचा चुलत भाऊ आहे. यालर सुमोनानं आता मौन सोडलं आहे. आणि खरं काय ते सांगितलं आहे.

Video: अमृता खानविलकर घागऱ्याची किंमत सांगून फसली, सोशल मीडियात होतेय ट्रोल

याबद्दल ई टाइम्सशी बोलताना सुमोना चक्रवर्ती म्हणाली, ‘अरे देवा, ही सोशल मीडियाची १० वर्ष जुनी कहाणी आहे. हा सगळा मूर्खपणा आहे.’ ती पुढे म्हणाली, ‘मला यावर फार काही बोलायचं नाहीय. मला माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायला आवडत नाही. काही गोष्टी पुढे गेल्या तर मी नक्कीच तुम्हाला सांगेन. त्याची घोषणा करेनच.’

सम्राट माझा फक्त मित्र
मग सम्राट आणि तिचं नातं काय? यावर सुमननं लगेच उत्तर दिलं. ती म्हणाली, ‘तो माझा मित्र आहे. तेवढंच. मी माझं कुटुंब, मित्र परिवार याबद्दल मीडियाशी बोलत नाही.’ मग सम्राटबरोबर लग्नाचा विचार आहे का? यावर ती म्हणाली, ‘मला वाटतं मी याचं उत्तर दिलं आहे.’

सुमोना पोस्ट

सुमोनानं जवळ जवळ १४ तास अगोदर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. आपल्या इन्स्टाग्राम स्टेटसमध्ये तिनं लिहिलं, ‘माझ्या खासगी आयुष्यात तुम्ही रस दाखवलात, त्याबद्दल धन्यवाद. पण ते इतकं गरजेचं नाही. मी लग्न करत नाहीय. तुम्ही दर वर्षी माझ्या लग्नाच्या बातम्या देता. मी कुणाबरोबर डेट करतेय, कुणाबरोबर लग्न करतेय, कुणाबरोबर राहतेय… या माझ्या खासगी गोष्टी आहेत. मला वाटेल तेव्हा त्या मी शेअरही करेन. पण तोपर्यंत अफवा पसरवू नका.’

कोण आहे सम्राट
सम्राटने १९९६मध्ये राम और श्याम सिनेमात पहिल्यांदा काम केलं होतं. १९९७मध्ये त्याचा भाई भाई हा सिनेमा रिलीज झाला. त्यानं बंगाली सिनेमातही काम खूप केलंय. २००५ मध्ये विशाल भारद्वाजच्या ‘द ब्लू अंब्रेला’मध्ये बिज्जूची भूमिका केली होती. २०१० मध्ये आशुतोष गोवारिकरच्या ‘खेलें हम जी जान से’मध्ये त्यानं स्वातंत्र्य सैनिक गणेश घोषची भूमिका साकारली होती.

कार्तिक आर्यन करत होता अभिनेत्रीला डेट, अखेर सांगितलं हृदयभंगाचं दुःख

सुमोना कुटुंबाबरोबर करतेय पर्यटन


सुमोनानं काही दिवस द कपिल शर्मा शोमधून ब्रेक घेतला आहे. तिनं आपल्या आईबरोबर जंगल सफारीचा फोटो शेअर केला आहे.

छोट्या पडद्यावरच्या मायलेकींची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here