औरंगाबाद : महागाईच्या जाळ्यात अडकलेल्या सर्वसामांन्याना आणखी एक झटका देणारी बातमी आहे. कारण, अवघ्या २० ते ३० रुपये किलोने मिळणाऱ्या टोमॅटोने आता भाव खाल्ला आहे. बाजारात टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. टोमॅटोचे दर ७० रुपये ते १०० रुपयांच्या घरात गेले आहेत. दररोजच्या वापरातील टोमॅटोचे दर भडकल्याने गृहणीचं बजेट कोलमडणार आहे.

काही महिन्यापूर्वी शेतकऱ्यांना भाव मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी औरंगाबादेत टोमॅटो रस्त्यावर फेकून दिले होते. मात्र, आता टोमॅटोचा भाव वधारला आहे. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळत नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा टोमॅटो उत्पादन कमी घेतलं. परिणामी टोमॅटोची कमतरता दिसून येते.

मुंबई ते पुणे गाठा फक्त ९० मिनिटांत, कसा असणार नवा मार्ग; वाचा सविस्तर…
दररोजच्या जेवणामध्ये टॉमेटोचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. आवक घटल्याने टोमेटॉची मागणी वाढली. आवक कमी आणि मागणी वाढल्याने टोमॅटोच्या दरात वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांना महागाईला सामोरे जावे लागत आहे. सध्या औरंगाबाद शहरात ठोक विमरीचे दर ८०० रुपये प्रति कॅरेट (साधारण २० किलो) आहे. तर बाजारात ७० ते १०० रुपये प्रति किलो ग्राहकांना विकला जात आहे. तसेच आगामी काही दिवसात टोमॅटोची आवक न वाढल्यास सर्वसामांन्याना आणखी चढ्या दराने टोमॅटो खरेदी करावा लागू शकतो.

मुंबईकरांना १५ दिवसांचा अल्टिमेटम; दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीलाही हेल्मेट बंधनकारक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here