नेमकं काय आहे प्रकरण?
राणा दाम्पत्याचे मुंबईतील खार येथे घर असून ज्या इमारतीत हे घर आहे त्या इमारतीबाबत अनेक तक्रारी पालिकेकडे आल्या होत्या. इमारतीतील अनेक सदनिकांमध्ये मंजूर आराखड्याच्या व्यतिरिक्त अधिकचे बांधकाम करून पालिकेच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आलं आहे, अशा तक्रारी प्राप्त झाल्याने मुंबई महापालिकेने तपासणीसाठी कलम ४८८ नुसार अनेक सदनिकाधारकांना नोटीस पाठवल्या आणि त्यानंतर मुंबई महापालिकेच्या पथकाने याबाबत तपासणी केली.
अवैध बांधकामाबाबत कारणे दाखवा नोटिशीला राणा दाम्पत्याने दिलेलं उत्तर अमान्य करत ७ ते १५ दिवसांमध्ये अनधिकृत बांधकाम हटवा, अन्यथा आम्हाला याबाबत कारवाई करावी लागेल, असा इशाराही महापालिकेकडून देण्यात आला होता.
‘माझा महाराष्ट्र माझी जबाबदारी कधी समजणार ?’ इंधन दरवाढीवरुन नवनीत राणांची उद्धव ठाकरेंवर टीका