सोशल मीडियावर अनेक जण ‘वाय’ अक्षराचे पोस्टर शेअर करत आहेत. कलाकारांनी, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हा फोटो शेअर केला आहे. ‘माझा पाठिंबा आहे ! आपला?’ असा प्रश्न विचारत अनेकांनी ‘वाय’ चे पोस्टर शेअर केले आहे. या प्रश्नाला सर्वसामान्यांनीही पोस्टर शेअर करत सकारात्मक प्रतिक्रिया दिली होती.
शिक्षण क्षेत्रात मोठा घोटाळा, पुष्कर जोगच्या आई विरोधात गुन्हा दाखल
दरम्यान संसदेचे सदस्य सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil Shared Y movie Poster) यांनीही ‘वाय’चे पोस्टर हातात घेऊन फोटो शेअर केला आहे. अर्थात आता सुजय विखे पाटील यांचाही या सिनेमाला पाठिंबा असल्याचे पाहायला मिळते आहे. त्यामुळे आता सर्वांनाच उत्कंठा लागून राहिली आहे की ‘वाय’ म्हणजे नेमकं आहे तरी काय?

सुजय विखे पाटील यांचा ‘वाय’ला पाठिंबा
अभिनेत्री मुक्ता बर्वे हिची ‘वाय’ सिनेमात प्रमुख भूमिका आहे. ती सोशल मीडियावर या सिनेमाचे प्रमोशन करताना दिसत आहे. या सिनेमाची निर्मिती कंट्रोल एन प्रोडक्शनद्वारे कऱण्यात आली आहे. याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार वास्तवाचा थरार दाखवणारा आणि कल्पनेच्या पलीकडील ‘ती’च्या लढ्याची गोष्ट सांगणारा हा सिनेमा आहे.
सोशल मीडियावर या पोस्टरची विशेष चर्चा होते आहे. कारण अनेक कलाकारांनी जरी या सिनेमाचे पोस्टर शेअर केले असले तरी चाहत्यांना ‘वाय’ म्हणजे नेमकं काय आहे हे माहित नाही आहे. चाहते त्याबाबत कमेंट्स करुन विचारत आहेत. आता २४ जून रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. त्यावेळी नेमके ‘वाय’ म्हणजे काय याचा उलगडा होईल.