चर्चेत राहण्यासाठी किंवा लोकांना आकर्षित करण्यासाठी तू हे असल्या अतरंगी अवतारात दिलेस? या प्रश्नावर उर्फीनं बोल्ड असं उत्तर दिलं. जे लोक म्हणतात, त्यांना चर्चेत राहायचं नाही, लोकांचं अटेन्शन नकोय, ते नक्कीच खोटं बोलत आहेत. अटेन्शन कोणाला नकोय? मला हे हवंय, त्यामुळं मला जे आवडतंय, योग्य वाटतंय ते मी का करू नये, मला चित्रपट किंवा मालिका मिळत नाहीयेत. मी जे करतेय ते चांगलं नाहीए का? असे अनेक प्रश्न करत उर्फीनं उत्तर दिलं.
चित्रपटांच्या ऑफर्स का येत नाहीत? यावर उर्फी म्हणाली की, बॉलिवूड काय माझ्या बापाचं नाहीए… मला लवकर चित्रपट मिळावे, असं वाटत असेल तर ते चुकीचं आहे. आणखी पाच वर्ष मला इथं द्यावी लागलीत, असंही उर्फी म्हणाली.
कास्टिंग डायरेक्टरच्या संपर्कात तू असतेच का? त्यांना तुझे फोटो पाठवते का ? यावर उर्फीनं भन्नाट असं उत्तर दिलं. उर्फी म्हणाली की, त्यांना माहित असावं की उर्फी जावेद कोण आहे आणि कशी दिसते.