मुंबई : अंबरनाथमध्ये एक भरधाव कार डिव्हायडरला धडकून उलटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील एकाचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी कारच्या चालकाला बेड्या ठोकल्या आहेत.

डिव्हायडरला धडकून उलटल्याने एर्टिगाचा अपघात…

अंबरनाथच्या कैलास नगर स्मशानभूमीकडून शिवमंदिराकडे जाणाऱ्या नवीन लोकनगरी बायपास रस्त्यावर कारचा भीषण अपघात झाला. या रस्त्यावरून बुधवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास एका एर्टिगा कारमध्ये ६ जण उल्हासनगरकडे चालले होते. यावेळी या कारने भरधाव वेगात असताना अचानक दुभाजकाला धडक दिली आणि कार उलटली. यामध्ये चालक सागर चांदवानी याला एअर बॅग उघडल्याने किरकोळ दुखापत झाली. पण गाडीतील इतर ५ जण जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रिक्षेतून या जखमींना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात नेलं. मात्र, तिथे अपघाताच्या वेळी चालकाच्या बाजूला बसलेला अनिल पंजाबी याचा मृत्यू झाला. तर संजू कलमचंदानी याला गंभीर इजा असल्यानं त्याला मुंबईच्या रुग्णालयात हलवण्यात आलं.

संजय राऊतांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; संजय पवारांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब
कार चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल…

याव्यतिरिक्त कारमधील बंटी नागदेव, दिनेश दुसेजा आणि दिनेश कासला यांना यामध्ये फारशी इजा झाली नाही. या अपघातानंतर पोलिसांनी चालक सागर चांदवानी यांच्याविरोधात बेदरकारपणे गाडी चालवणे आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

केंद्र सरकारचे ऑपरेशन ब्लॅकबोर्ड काय आहे; विद्यार्थ्यांना कसा होणार फायदा?
अपघातावेळी सर्वजण मद्यधुंद अवस्थेत…

ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी गाडीच्या चालकासह जवळपास सर्वजण मद्यधुंद अवस्थेत होते, अशी माहिती स्थानिक प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. दरम्यान, नव्याने बांधण्यात आलेल्या लोकनगरी बायपास रस्त्यावर एकही स्पीडब्रेकर नसून त्यामुळं इथून जाताना गाड्यांचा वेग नेहमीच वाढलेला असतो. या वेगामुळे आजवर अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळं या रस्त्यावर स्पीडब्रेकर्स लावण्याची मागणी आता केली जात आहे.

Samsung Offers: सॅमसंग Galaxy F22 आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीत खरेदी करण्याची संधी, पाहा डील आणि फीचर्स

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here