मुंबई: अभिनेत्री अनुष्का शर्मा तिच्या अपकमिंग ‘चकदा एक्सप्रेस‘ या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. Chakda Xpress साठी अभिनेत्री क्रिकेटच्या मैदानात घाम गाळताना दिसत आहे. मात्र क्रिकेट खेळताना तिला विशेष मेहनत घ्यावी लागते आहे. यावेळी ती घेत असलेले कष्टही तिची हालत खराब करणारे आहेत. अभिनेत्रीने स्वत: इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. इस्टाग्रामवर अनुष्का शर्माने शेअर केलेल्या स्टोरीमध्ये तिचा दमलेला चेहरा स्पष्टपणे दिसत आहे.

अभिनेत्रीने या फोटोला दिलेलं कॅप्शन तिचा ‘स्ट्रगल’ सांगणारं आहे. अनुष्काने फोटो शेअर करत असं म्हटलं आहे की, ‘जर लहानपणी थोडं तरी क्रिकेट खेळले असते तर आज ही हालत झाली नसती.’ अनुष्का शर्मा Chakda Xpress या सिनेमात महिला क्रिकेट विश्वातील दिग्गज क्रिकेटपटू झुलन गोस्वामीच्या भूमिकेत दिसणार आहे. यासाठी ती कठोर मेहनत घेत आहे, तसंच याबाबत अनुष्का शर्मा तिच्या चाहत्यांना या सिनेमाच्या शूटिंगचे अपडेटही देत असते.

Anushka Sharma Story

फोटो सौजन्य- अनुष्का शर्मा/इन्स्टाग्राम

अनुष्काने अलीकडेच एक इन्स्टाग्राम पोस्ट देखील केली होती. ज्यामध्ये तिने नो मेकअप लुक शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना तिने असे म्हटले आहे की, ‘Tan’ on ten. अर्थात हा टॅन लुक मैदानात कडक उन्हात घाम गाळल्यामुळे झाला असावा असा अंदाज आहे. तिच्या या नो मेकअप लुकचेही चाहते कौतुक करत आहे.


Chakda Xpress या सिनेमाबाबत बोलायचे झाले तर या सिनेमाचा पहिला टीजर जानेवारी महिन्यात शेअर करण्यात आला होता. भारतीय क्रिकेट महिला संघाची माजी कर्णधार झुलन गोस्वामी हिच्या आयुष्यावर आधारीत हा सिनेमा आहे. या सिनेमाविषयी बोलताना एका मुलाखतीमध्ये अनुष्काने असेही म्हटले आहे की ती काही बॅटिंग टिप्स क्रिकेटर-पती विराट कोहली याच्याकडून देखील घेते.

Big Boss 16 : सुरू होतोय सलमान खानचा बहुचर्चित शो, इथे वाचा सदस्यांची यादी

या सिनेमाचे दिग्दर्शन प्रोसित रॉयने केले असून अनुष्कासाठी हा सिनेमा खास असणार आहे. कारण आई झाल्यानंतर दीर्घ काळानंतर अनुष्का बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे. ती शेवटचे शाहरुख खान याच्यासह झिरो या सिनेमात २०१८ साली दिसली होती. त्यामुळे हा सिनेमा यशस्वी झाल्यास अनुष्कासाठी ही बाब अत्यंत महत्त्वाची ठरू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here