मुलानेच केला आई आणि आजीचा खून…
धुळे तालुका पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून या दुहेरी हत्याकांडाचा तपास सुरू असताना काही धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासादरम्यान उघडकीस आली आहे. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला असता मुलानेच आई व आजीचा डोक्यात लोखंडी रॉड टाकून खून केला असल्याची माहिती उघडकीस आली.
आईच्या चारित्र्याच्या संशयावरून केला खून…
आईच्या चारित्र्याच्या संशयावरून पोटच्या मुलानेच हे हत्याकांड केले असल्याचे निष्पन्न निष्पन्न झाले आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने या खुनी मुलाच्या मुसक्या ३६ तासात आवळल्या असून त्याने या खुनाची कबुली देखील दिली आहे. रात्रीच्या वेळी दुचाकीवरून मुलाने आजीच्या घरी पोहोचून लोखंडी रॉड बाहेर झोपलेल्या आई व आजीच्या डोक्यात मारून या दोघेही मायलेकींची निर्घुणपणे हत्या करून त्या ठिकाणाहून पळ काढला होता. चंद्रभागा बाई माळी ६५ व वंदना महाले ४५ हे दोघेही मृत आई व मुलीची नाव आहेत.
कौटुंबिक वादामुळे मुलगी माहेरी…
मुलगी वंदना महालेचे वैवाहिक वाद सुरू असल्यामुळे ती आईकडेच राहत होती. तरवाडे गावातच हॉटेल व्यवसाय करून उदरनिर्वाह करीत होती. पहाटे दोघी मायलेकींचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला. त्यांची निर्घृण हत्या करण्यात आल्यानंतर या हत्येसंदर्भात तर्कवितर्क लावले जात होते.