इंदौर : इंदौरमधील तिहेरी हत्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने निकाल सुनावला आहे. मध्य प्रदेशातील इंदौर शहरात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील तीन महिलांची जून 2011 मध्ये निर्घृण हत्या करण्यात आली होती. आजी, आई आणि मुलगी अशा तीन पिढ्यांमधील तिघी जणींचा चोरीच्या उद्देशाने जीव घेण्यात आला होता. मॉलमध्ये झालेल्या भेटीनंतर ओळख वाढवून ब्युटिशियन नेहा वर्मा आणि तिच्या बॉयफ्रेण्डने ही तिहेरी हत्या केली होती. हत्येनंतर काही दिवसांतच आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. 2013 मध्ये कनिष्ठ कोर्टाने आरोपी युगुलाला सुनावलेली फाशीची शिक्षा हायकोर्टाने कायम ठेवली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने त्यांची शिक्षा जन्मठेपेत रुपांतरित करुन गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.

कशी झाली ओळख?

आरोपी नेहा वर्मा आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत इंदौरमधील एका मॉलमध्ये फिरत होती. त्यावेळी तिची भेट ४२ वर्षीय मेघा देशपांडेंसोबत झाली. मेघा यांनी परिधान केलेले दागिने पाहून नेहाचे डोळे गरगरले. तिने मेघा यांच्याशी ओळख वाढवली. मेघा देशपांडेंचे पती बँक अधिकारी असून कामानिमित्त बाहेरगावी असतात, तर घरात तिघी महिलाच असतात, असं नेहाला बोलताना समजलं. इंदौरच्या श्रीनगर भागात राहणाऱ्या देशपांडेंच्या घरी नेहाने ये-जा वाढवली.

जजसाहेब, बायको बॅटनं दररोज मारते, सुरक्षा द्या! CCTV फुटेज घेऊन मुख्याध्यापक कोर्टात

नेहा वर्मा आपल्या बॉयफ्रेण्डसोबत विवाहबंधनात अडकण्याच्या तयारीत होती. तिचा प्रियकर रोहित छोटी-मोठी नोकरी करत होता. त्याच वेळी दोघांना आर्थिक चणचण जाणवत होती. नेहाने मेघा देशपांडेंच्या श्रीमंतीचा उल्लेख करत रोहितच्या डोक्यात पिल्लू सोडलं. त्यानंतर दोघांनी मिळून लुटीचा प्लॅन आखला.

तिघींची निर्घृण हत्या

ओळखीचा गैरफायदा घेत नेहा मेघा देशपांडेंच्या घरी ब्यूटी कंपनीचा फॉर्म भरण्यासाठी गेली. त्यानंतर अडचण येत असल्याचं सांगून तिने रोहितला बोलावलं. त्याने मेघा देशपांडे यांची गोळी झाडून हत्या केली. नंतर त्यांची आई रोहिणी फडके आणि मुलगी आश्लेषा देशपांडे यांनाही जीवे ठार मारलं. तिघींच्या शरीरावर चाकूने सपासप वार करण्यात आले. देशपांडेंच्या घरातून रोख रक्कम आणि ज्वेलरी घेऊन दोघं फरार झाले.

जाळ्यात कशी सापडली?

मेघा देशपांडे यांच्या एटीएम कार्डने पैसे काढताना नेहा जाळ्यात अडकली. नंतर पोलिसांनी तिचा प्रियकर रोहित आणि त्याच्या मित्रालाही अटक केलं. डिसेंबर २०१३ मध्ये तिघांना दोषी ठरवून इंदौर जिल्हा कोर्टाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर आरोपींनी हायकोर्टात धाव घेतली. २०१४ मध्ये मध्य प्रदेश हायकोर्टाच्या इंदौर खंडपीठाने हा फैसला कायम ठेवला. त्यानंतर तिघंही सुप्रीम कोर्टात गेले, तिथे त्यांना दिलासा मिळाला.
हातात बेड्या, माना खाली, पोलिसांनी गुंडांची जिरवली! बेड्या घालून धिंड
फाशीची शिक्षा रद्द का?

सुप्रीम कोर्टाचे जस्टिस यू यू ललित, एसआर भट आणि बेला एम त्रिवेदी यांच्या खंडपीठाने इंदौरमधील तिहेरी हत्येच्या दोषींना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला २५ वर्षांच्या तुरुंगवासात रुपांतरित केलं आहे. तुरुंगातील चांगले वर्तन पाहून कोर्टाने हा निर्णय घेतला. तिघांपैकी एक जण क्रिकेट टीमचा कर्णधार झाला, तर दुसरा आरोग्यदूत झाला. तर नेहाने पाककलेत कौशल्य मिळवलं. तुरुंगातील इतर कैद्यांशी तिघांची वादावादी झाली नसल्याकडेही कोर्टाने लक्ष वेधलं.

रोहितचा मित्र असलेला आरोपी मनोज उर्फ राहुलच्या पायाला गोळी लागली होती. ट्रायल कोर्टाने या घटनेचा उल्लेख न करणं ही गंभीर त्रुटी असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं. फाशीची शिक्षा सुनावण्यापूर्वी आरोपीची कौटुंबिक पार्श्वभूमी लक्षात घेणंही गरजेचं असल्याचं कोर्ट म्हणालं. तसंच आरोपी नेहा वर्माची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचंही न्यायालयाने सांगितलं.

पती फोनवर बोलत होता, तेवढ्यात पत्नीला ट्रेनने उडवलं; रुळावर जाईपर्यंत सगळं संपलं होतं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here