यवतमाळमध्ये चिखली भंडारी येथील खाजगी प्रवासी वाहनाने जात असताना अपघात झाला. बोरगाव जवळील भंडारी रस्त्याच्या वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि प्रवासी वाहन पलटी झाले.
१३ प्रवासी गंभीररित्या जखमी
या अपघातात तब्बल १३ प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत. नागरिकांनी धावपळ करून त्यांना आर्णी ग्रामीण रुग्णालयात येथे दाखल केले. प्रथमोपचार करून ८ गंभीर जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालय यवतमाळ येथे हलवण्यात आले आहे.
जखमी प्रवाशांमध्ये सीताबाई शिंदे (वय ६० वर्ष), उकंडाबाई सेगर (वय ६० वर्ष), आशा शिंदे (वय १८ वर्ष), मैना बाई सोळंके (वय ६० वर्ष), सुरेश तांबे (वय १८ वर्ष), राजू शेगर (वय २५ वर्ष), दीपक सोळंके (वय २५ वर्ष), चेतन शिंदे (वय १३ वर्ष) सर्व राहणार भंडारी (ची) यांना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे.
उर्वरित ५ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून सुट्टी देण्यात आली. अपघातातील जखमींवर आर्णी ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर मिलिंद दुधे यांनी उपचार केले आहे. अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण रुग्णालयात बघ्यांची गर्दी उसळली होती.
‘या’ जोडप्यानं एकाच दिवशी दोनदा लग्न का केलं?