sindhudurg tarkarli: सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर ३१ ऑगस्टपर्यंत पर्यटन बंदी, तारकर्ली दुर्घटनेच्या पार्श्वभूमिवर प्रशासनाचा मोठा निर्णय – big news tourism ban on sindhudurg coast till 31st august tarkarli accident
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टी भागातील साहसी जलक्रीडा प्रकार तसेच किल्ला प्रवासी होडी वाहतूक सेवा २६ मे पासून ३१ ऑगस्टपर्यत बंद करण्याचे आदेश मेरीटाईम बोर्डाने दिले आहेत. त्यामुळे कोकणातील सिंधुदूर्ग किनारपट्टी भागातील गजबजलेले पर्यटन आजपासून बंद होणार आहे.
हा निर्णय घेण्याअगोदर काल तारकर्ली येथे स्कूबा डायव्हिंगची बोट उलटून मोठी दुर्घटना घडली. या घटनेत दोन पर्यटकांना आपला प्राण गमवावा लागला. या बोटीत २० जण होते. या पार्श्वभूमीवर मेरीटाईम बोर्डाचे प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन सूरज नाईक यांनी मालवण बंदर कार्यालयास भेट दिली. यावेळी त्यांनी किल्ला दर्शनास जाणारे तसेच अन्य पर्यटन बोटीवर पर्यटक लाईफ जॅकेट वापर करतात का? याची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत बंदर निरीक्षक आर. जे. पाटील, बाळासाहेब कदम आदी उपस्थित होते. पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न फसला, रशियाच्या राष्ट्रपतींचा पाचव्यांदा मृत्यूला चकवा सिंधुदूर्ग मधील सर्वच किनारे पर्यटकाच्या गर्दीने गजबजून गेले होते कारण दोन वर्षे कोरोनामुळे पर्यटन बंद होते. त्यामुळे यावर्षी पर्यटन व्यवसाय तेजीत होता देशी विदेशी लाखो पर्यटक यांनी भेट दिली होती. आता पर्यटन हंगाम संपत आल्याने अनेक पर्यटन व्यावसायिकांनी आपल्या नौका किनार्यावर आणण्यास सुरवात केली आहे. या बंदी कालावधीत पर्यटन व्यावसायिकांनी जलक्रीडा व्यवसाय सुरू ठेवल्याचे दिसून आल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा मेरीटाईम बोर्डाच्या अधिकार्यांनी संबंधितांना इशारा दिला आहे.