विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, सदाभाऊ खोत यांच्यासह एकूण १० जागांवर विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे. महाविकास आघाडी सरकारसाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे.

 

Subhash Desai Pravin Darekar Ramraje Nimbalkar
सुभाष देसाई प्रविण दरेकर रामराजे नाईक निंबाळकर
मुंबई : महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना विधानपरिषद निवडणुकांची घोषणा झाली आहे. महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या १० जागांसाठी ही निवडणूक होत आहे. २ जूनला अधिसूचना जाहीर होईल. ९ जूनपासून अर्ज दाखल करता येणार आहेत आणि २० जूनला मतदान होणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणासाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, सदाभाऊ खोत यांच्यासह १० जागांवर निवडणूक होणार आहे. महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. राज्यसभेपाठोपाठ विधानपरिषद निवडणूक लागल्यानं राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. २२ जुलै रोजी या १० आमदारांची मुदत संपत आहे. तत्पूर्वी २० जूनला २० जूनला मतदान होत आहे.

कसा असेल निवडणुकीचा कार्यक्रम

 • विधानपरिषद निवडणुकीसाठी २ जून रोजी अधिसूचना जारी होईल.
 • ९ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केले जातील.
 • १० जूनला निवडणूक अर्जांची छाननी केली जाईल.
 • अर्ज मागे घेण्यासाठी १३ जूनची मुदत असेल.
 • २० जून रोजी मतदान पार पडेल.
 • सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान पार पडेल.
 • २० जून रोजी सायंकाळी पाच नंतर मतमोजणी होईल.

या दहा विधान परिषद आमदारांचा कार्यकाळ संपतो आहे….

 • सदाभाऊ खोत
 • सुजितसिंह ठाकूर
 • प्रविण दरेकर
 • सुभाष देसाई
 • रामराजे नाईक निंबाळकर
 • संजय दौंड
 • विनायक मेटे
 • प्रसाद लाड
 • दिवाकर रावते
 • रामनिवास सिंग

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : maharashtra legislative council ten seats election programme declared voting will be conduct on 20 june
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here