भाजपचे प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, सुजितसिंह ठाकूर, सदाभाऊ खोत, विनायक मेटे या आमदारांची मुदत संपत आहे. तर रामनिवास सत्यनारायण सिंह यांचे निधन झाल्याने जागा रिक्त झाली आहे. तर शिवसेनेकडून सुभाष देसाई, दिवाकर रावते आणि राष्ट्रवादीकडून रामराजे नाईक निंबाळकर, संजय दौंड यांचीही मुदत संपत आहे.
विधानपरिषदेचं गणित समजून घ्या
विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी 27 मतांची आवश्यकता आहे. भाजप आणि मित्रपक्ष यांचं संख्याबळ 113 इतकं होत असल्यामुळे भाजपच्या चार जागा सहज निवडून येऊ शकतात.
दुसरीकडे, महाविकास आघाडीतून शिवसेना आणि राष्ट्रवादीचेही प्रत्येकी दोन आमदार विधान परिषदेत जातील. तर काँग्रेसच्या वाट्याला एक जागा येईल. त्यानंतरही त्यांच्याकडे पहिल्या पसंतीची मतं शिल्लक राहत असून दुसऱ्या उमेदवारासाठी त्यांना 12 मतांची तजवीज करावी लागणार आहे.
भाजपकडून कोण-कोण?
भाजपचे प्रवीण दरेकर, प्रसाद लाड या दोघांची उमेदवारी निश्चित मानली जाते. तर विनायक मेटे आणि सदाभाऊ खोत यांना तिकीट मिळण्यावर शंका उपस्थित केली जात आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ यांना संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शिवसेनेकडून कोणाला तिकीट?
मातोश्रीचे निकटवर्तीय सुभाष देसाई यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे, मात्र दिवाकर रावतेंना पुन्हा तिकीट मिळण्याची शक्यता धूसर आहे.
राष्ट्रवादीकडून परिषदेवर कोण?
राष्ट्रवादीकडून रामराजे निंबाळकरांचं तिकीट कन्फर्म मानलं जातं. तर दुसरी जागा कोणाला मिळणार, याची उत्सुकता आहे.
काँग्रेसकडून कोणाला संधी?
काँग्रेसचा एकही उमेदवार निवृत्त होत नाही. मात्र या जागेवर कुणाला संधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
बापाची छाती अभिमानाने फुगली; हवालदाराची लेक बनली ‘मिस इंडिया ग्लोबल’