श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील टीव्ही हिची दहशतवाद्यांनी गोळी मारुन केली आहे. दहशतवाद्यांनी अमरिनच्या घरात घुसून तिची हत्या केली आहे. बडगाममधील छदोरामध्ये ही घटना घडल्याची माहिती जम्मू काश्मीर पोलिसांनी दिली आहे. जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये अमरिन भटचा मृत्यू झाला तर तिचा पुतण्या जखमी झाला आहे.

जम्मू काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लष्कर ए तोयबाच्या तीन दहशतवाद्यांनी अमरिन भटवर गोळीबार केला. अमरिन भट हिच्या घरात घुसून दहशतवाद्यांनी गोळीबार केला आहे.

बडगाममधील छडोरा येथील अमरिन भटच्या घरात दहशतवादी घुसले आणि त्यांनी गोळीबार केला. अमरिन भट हिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. अमरिन भट हिचा १० वर्षीय नातू जखमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अमरिन भटच्या पुतण्याच्या खांद्याला गोळी लागल्यानं जखम झाल्याची माहिती आहे.

पोलिसांनी या घटनेनंतर दहशतवाद्यांचा शोध सुरु केला आहे. याशिवाय पोलिसांनी या घटनेची नोंद घेतील आहे. या घटनेंसंदर्भात अधिक माहिती अद्याप मिळालेली नाही.

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून कारवाया सुरुच आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये दहशतवाद्यांच्या कारवाया वाढल्या आहेत. काल एका पोलिसावर आणि त्याच्या ७ वर्षीय मुलीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यामध्ये पोलिसाचा मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here