Maharashtra Buldhana News : ज्या वयात व्यवस्थित बोलता येत नाही, उभंही राहता येत नाही. अशा वयात या अवघ्या दीड वर्षाच्या चिमुकल्यानं चक्क ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये आपलं नाव नोंदवलं आहे. एवढंच नाहीतर ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’च्या इतिहासात एवढ्या कमी वयात हा किताब पटकावणारा हा पहिला चिमुकला ठरला आहे. 

बुलढाणा शहरातील गणेश नगर परिसरात राहणारा आरोह पाटील चिमुकला. वय अवघं दीड वर्षांचं. पण कर्तबगारी म्हणाल तर चक्क ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नाव. पण असं आरोह करतो तरी काय? तर आरोह कोणत्याही कार्डवरील नावं पटकन सांगतो. आरोह अगदी तीन महिन्यांचा असताना त्याच्या आईनं त्याला फ्लॅश कार्डची ओळख करुन दिली. पण आता आरोह कोणत्याही कार्डावरील नाव अगदी सहज सांगतो. आरोहच्या आई-वडिलांनी त्याचे व्हिडीओ तयार करुन ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ला पाठवले. ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’नं आरोहची तात्काळ दखल घेतली. त्याचे व्हिडीओ पाहिले. आणि त्याला सुवर्ण पदक देऊन ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये स्थान दिलं. हा किताब पटकावणारा आरोह भारतातील सर्वात कमी लहान मुलगा आहे. 

एबीपी माझानं आरोहच्या घरी जाऊन त्याच्या आई-वडिलांशी बातचित केली. त्यावेळी आरोहची आत्मसात करण्याची पावर खूप दांडगी आहे. त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. आजच्या परिस्थितीत लहान-लहान मुलं मोबाईल युगात अडकली आहेत. त्यांच्या मनावर ताण वाढत आहे, दुर्घटना होत आहे. वाईट वाटतं, मी पालकांना सांगेन की, आपल्या पाल्याकडे काळजीनं लक्ष द्या आणि मोबाईलपासून दूर ठेवा, अशी प्रतिक्रिया आरोहचे वडिल सूरज पाटील यांनी दिली आहे. तसेच, आम्ही, आरोह लहान असतानाच त्याला फ्लॅश कार्ड दाखवून चित्रांची ओळख करवून दिली. त्यात महापुरुष, जनरल असं सर्वकाही होतं. आता तो सहजपणे कार्डवरील नावं पटापट सांगतो. त्यानं इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये स्थान मिळविल्यानं आम्हा सर्वांना त्याचा खूप अभिमान वाटतो. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here