मुंबई :मलायका अरोरा नेहमीच वेगवेगळ्या फॅशन्स करत असते. तीच तर तिची खासियत आहे. आपल्या अनोख्या अंदाजात ती नेहमी समोर येते. करण जोहरनं दिलेल्या ५०व्या बर्थडे पार्टीतही मलायकाची एंट्री धमाकेदार झाली. तिचा पोशाख बघून सगळे पाहातच राहिले. ती इतकी हाॅट दिसत होती की तिच्यावरून कुणाची नजर हटत नव्हती.

ऐश्वर्या-सलमान आमने सामने, करण जोहरच्या पार्टीचे रंगीन नजारे

ब्रा टाॅप आणि ब्लेझरमध्ये मलायका ‘मार डाला’ अशा रूपातच समोर आली. सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल झाले आहेत. तिच्या फॅन्सना तिची ही अदा आवडली, पण काहींनी नापसंतीही दर्शवली.

युझर्सचं म्हणणं होतं की मलायकाची ड्रेसची पसंती अतिशय वाईट झाली आहे. पण फॅन्स मलायकाच्या या लुकवर फिदाही झाले आहेत. एका चाहत्यानं लिहिलं आहे, ‘मलायकाला कुठलाही ड्रेस छानच दिसतो.’

मलायका अरोरा

करण जोहरची वाढदिवसाची पार्टी चांगलीच रंगली. या पार्टीत तीनही खान हजर होते. सलमान, आमिर आणि शाहरुख. अनेक वर्षांनी सलमान आणि ऐश्वर्या आमने सामने आले. ऐश्वर्या राय बच्चन अभिषेक बच्चनसोबत होती. करण जोहरच्या बर्थडे पार्टीत ऐश्वर्या गोल्डन गाऊन आणि वर ब्लेजर घातला होती. तर अभिषेक सूटमध्ये होता. सलमान खान जिन्स आणि काळ्या टी शर्टमध्ये होता.

हृतिक रोशन-सबा आझाद या दोघांनी करणच्या पार्टीत एकत्र हजेरी लावली होती. या ग्रँड पार्टीमध्ये या जोडीकडेच सर्वांचं लक्ष होतं, त्यांचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यांनी आउटफिट देखील सारखं परिधान केलं होतं. त्यांनी ब्लॅक आउटफिटमध्ये करण जोहरच्या पार्टीमध्ये एंट्री केली होती. हातात हात घेऊन त्यांनी कॅमेरासमोर रोमँटिक पोज देखील दिली.

करणच्या पार्टीत गर्लफ्रेंड सबासह हृतिकची एंट्री, रोमँटिक PHOTOS VIRAL

मेक्सिकोच्या बीचवर अप्सरा, सोनालीच्या बिकिनी लूकची चर्चा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here