मुंबई: साडी तसा अनेक स्त्रियांचा जिव्हाळ्याचा विषय असतो. बहुतेक जणींना जुन्या-उंची साड्या जपून ठेवण्याचा जणू छंदच असतो. एक स्पेशल बाँड त्यांचा या साडीशी निर्माण झालेला असतो. साडीमुळे प्रत्येक स्त्रिच्या सौंदर्यात एक वेगळीच भर पडते. मग या साडीप्रेमाबाबत अभिनेत्री तरी कशा मागे राहतील? नुकताच साखरपुडा झालेली अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) हिने देखील एका स्पेशल शालूमधील फोटो शेअर केला आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत ज्यामध्ये तिने जरीच्या शालूतील (Akshaya Deodhar in Saree) मराठमोळा लुक शेअर केला आहे.

करणच्या पार्टीत गर्लफ्रेंड सबासह हृतिकची एंट्री, रोमँटिक PHOTOS VIRAL

अभिनेत्री अक्षया देवधर हिने अलीकडेच तिच्या मैत्रिणीच्या लग्नाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमादरम्यानचे फोटो तिने शेअर केले आहेत. अभिनेत्रीने इन्स्टा स्टोरीमध्ये देखील एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने असं म्हटलं आहे की तिने परिधान केलेली साडी ४० वर्ष जुनी आहे.

WhatsApp Image 2022-05-26 at 12.43.37 PM.

फोटो सौजन्य- अक्षया देवधर/इन्स्टाग्राम

अक्षयाचा मराठमोळा लुक चाहत्यांच्या देखील पसंतीस उतरत आहे. तिने या जरीच्या शालुला साजेशी अशी ज्वेलरी परिधान केली असून त्यातही मराठमोळा टच आहे. तिने मोत्याची नथ आणि चोकर याशिवाय गजराही माळला आहे. हातामध्ये हिरव्या आणि मोत्याच्या बांगड्या असून मेंदी देखील काढली आहे. अभिनेत्रीने केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टनुसार ही साडी तिच्या ताईच्या सासुबाईंची आहे. यासाठी कॅप्शन देताना अक्षयाने म्हटलं आहे की, ‘या जरीच्या शालूच्या प्रेमात आहे’


अभिनेत्रीच्या या लुकवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. ‘लय भारी आणि खूप छान दिसताय बघा तुम्ही’, ‘लै गोड दिसून राहिल्या मास्तरीन बाई’, ‘तू Fashion Diva आहेस’, ‘Gorgeous’ अशा काही कमेंट्स चाहत्यांनी तिच्या या फोटोवर केल्या आहेत.


‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेमुळे घराघरांत पोहोचल्या अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी (Akshaya Deodhar and Hardik Joshi) यांच्या जोडीवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केलं. मालिकेनं निरोप घेतल्यानंतरही दोघं नेहमीच चर्चेत असतात. अक्षयाच्या स्टायलिश फोटोंची सोशल मीडियावर सतत चर्चा सुरू असते. या दोघांनी साखरपुडा करुन त्यांच्या चाहत्यांना सरप्राइज दिलं होतं. या दोघांच्या खास नात्याची अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती, पण याबद्दल दोघांनीही कधी स्पष्टपणे सांगितलं नव्हतं. मात्र मे महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी साखरपुडा (Akshaya Deodhar and Hardik Joshi Engagement) करत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता.

‘तुझ्यात जीव रंगला’ म्हणत अक्षया आणि हार्दिकचा पार पडला साखरपुडा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here