उर्फीला सिनेसृष्टीत करिअर करायचं आहे. त्यासाठी तिनं घरच्यांचा विरोधही पत्करला आहे. असे हटके आणि बोल्ड कपडे घातल्यानंतर नातेवाईक तिला नावं ठेवायचे, अनेकदा तिचे कपडेही फाडण्यात आले, असं उर्फीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे. ज्या लोकांना माझ्या कपड्यांचा, माझ्या बोल्ड असण्यावर राग होता, तेच आता माझ्यासोबत काढण्यासाठी आता तरसत आहेत, असं उर्फीनं म्हटलं आहे.
सोशल मीडियावर ट्रोल होण्याबद्दलही उर्फी व्यक्त झाली’मी पाहिले की, मी जे काही पोस्ट करते त्यावर लोक काही ना काही बोलतातच. मी बिकिनी घालो अथवा सलवार सूट, लोक त्यावर वाईटच कमेंट करतात. मी लखनऊ येथील एका साध्या कुटुंबातून आले आहे. तेव्हा देखील आमच्याकडे कपडे कसे घालावे यावर कधी प्रश्न उपस्थित झाले नाहीत. आज मला जे आवडतील ते कपडे घालते. तेच मला आवडतं. लोकांना त्याबद्दल काय वाटते, याची पर्वा मी करणार नाही.’
एअरपोर्टवरील लुक हा प्रसिद्धी मिळवण्याचा मार्ग असतो का असा प्रश्न जेव्हा तिला विचारण्यात आला तेव्हा ती म्हणाली, ‘जर मला प्रसिद्धी मिळवायची असेल तर मी एअरपोर्टवर कपडे न घालताच गेले असते. मी जशी आहे तशी आहे. त्यावरून ही जर मला प्रसिद्धी मिळत असेल तर ते माझ्यासाठी चांगलेच आहे.’