मुंबई: ‘रानबाजार‘ या मराठी वेब सीरिजची सोशल मीडियावर खूपच चर्चा आहे. मराठीमधील आतापर्यंतची सर्वात बोल्ड सीरिज असल्याचा दावा करण्यात आला आहे. सीरिजमध्ये प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित यांचे अत्यंत बोल्ड सीन पाहायला मिळत आहे. अनेकांना त्यांच्या भूमिका आवडल्या आहेत,तर काहींनी या दोन्ही अभिनेत्रींना ट्रोल केलं आहे.
प्राजक्ता आणि तेजस्विनीचा ‘रानबाजार’मधील बोल्डनेस पाहून प्रेक्षक म्हणाले…
प्राजक्ताचा इतका बोल्ड अंदाज पहिल्यांदाच प्रेक्षकांनी पाहिला. त्यामुळं अनेकांनी तिच्या टीका केली. पण या टीकेलाही तिनं तिच्या शब्दांत उत्तर दिलं. तिची ही पहिलीच वेब सीरिज आहे. यापूर्वी तिनं अनेक सीरिजच्या ऑफर्स नाकारल्या होत्या. काही महिन्यांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत तिनं ओटीटी आणि वेब सीरिजवर भाष्य केलं होतं.


ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या वेब सीरिज किंवा चित्रपटांमध्ये प्रचंड बोल्ड कन्टेंट दाखवण्यात येतो. प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी हे केलं जातं, यात नवीन असं काही नाही. पण याबद्दल बोलताना प्राजक्तानं काही वेगळं मत मांडलं होतं.

‘वेब सीरिजसाठी विचारणा झाली; पण अनावश्यक बोल्ड सीनमुळं त्यात दिसले नाही’, असं प्राजक्ता म्हणाली होती. ‘बोल्ड दृश्यांमुळंच मी आतापर्यंत वेब सीरिजमध्ये दिसले नाही. बोल्डनेस कथेची गरज असेल, तर ठीक आहे. उगाच त्यामुळं प्रेक्षक वाढतील असं लॉजिक लावलं जात असेल, तर ते कळणं अवघड आहे’, असं तिनं तिच्या एका मुखातीतल म्हटलं होतं.
Video: हादरवून टाकणारा ‘रानबाजार’चा ट्रेलर आला समोर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here