मुंबई: ‘रात्रीस खेळ चाले‘ या मालिकेमुळे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली. या मालिकेत अपूर्वाने साकारलेली शेवंता ही भूमिका तुफान गाजली. ती मालिका संपल्यानंतर लगेचच अपूर्वाला ‘तुझं माझं जमतंय’ ही दुसरी मालिका मिळाली होती. या मालिकेतली तिची पम्मी ही भूमिकाही प्रेक्षकांना आवडली, पण काही कारणामुळं तिनं ही मालिका देखील सोडली. त्यानंतर ती ऐतिहासीक मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली.
इतर सीरिजमधील बोल्ड सीनबद्दल काय म्हणाली होती प्राजक्ता? वाचून विश्वास बसणार नाही
अपूर्वाच्या अभिनयासाठी तिचं नेहमीच कौतुक होत आलं आहे. परंतु तिनं तिच्या खासगी आयुष्याद्दल बोलणंही नेहमीट टाळलं. पण सोशल मीडियावरील एका प्रश्न आणि उत्तरांच्या सेशनमध्ये तिनं नुकताच तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. Ask me Anything या सेशनमध्ये अपूर्वानं चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची मनमोकळे पणानं उत्तरं दिली. एका चाहत्यानं तिला रिलेशनशीप स्टेटस विचारलं त्या प्रश्नाचंही तिनं खरंखरं उत्तर दिलं.

एका चाहत्यानं अपूर्वाला तू सिंगल आहे की मॅरिड असा प्रश्न विचारला. यावर अपूर्वानं तिच्या मनातील खास गोष्ट शेअर केली. सध्या तरी मी सिंगल आहे, पण त्या खास व्यक्तीची (soulmate)ची वाट पाहतेय’, असं तिनं सांगितलं.

सोशल मीडिया सेशन

मला कपडेच काढायचे असते तर…’रानबाजार’मधील सीनवर तेजस्विनी स्पष्टच बोलली

अपूर्वाच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, ती रोहन देशपांडेसोबत विवाहबंधानात अडकली होती. अडकली. पारंपरिक पद्धतीनं मुंबईत दोघांचा लग्नसोहळा पार पडला होता. पण त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. त्यामुळं तिच्या रिलेशनशीपबद्दल अनेकदा चर्चा सुरू होत्या. पण तिनंही कधी याकडं लक्ष न देता अभिनयावर लक्ष केंद्रीत केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here