हे कुटुंब ग्वाल्हेरच्या सिरोली गावात आयोजित विवाह सोहळ्यासाठी गेले होते. तिथून ते मुरैना इथं परतत होते. यावेळी रस्त्याच्या कडेला बसची वाट पाहत उभ्या असलेल्या या कुटुंबाला कारने चिरडले. अपघातानंतर संतप्त लोकांनी घटनास्थळी रस्ता रोको केला. तर पोलीस आणि प्रशासनाने एफआयआर नोंदवून आरोपी कार चालकाचा शोध सुरू केला आहे.
बसची वाट पाहत उभे होते कुटुंब
मुरैना जिल्ह्यातील डुंगरपूर किरार इथं राहणारे महेंद्र जाटव कुटुंबातील पाच सदस्यांसह ग्वाल्हेर जिल्ह्यातील सिरोली गावात एका नातेवाईकाच्या घरी लग्नासाठी आले होते. बुधवारी रात्री विवाह कार्यक्रमात संपूर्ण कुटुंब आनंदाने सहभागी झाले. गुरुवारी दुपारी महेंद्र हे कुटुंबासह मुरैना इथे जाण्यासाठी रस्त्याच्या कडेला बसची वाट पाहत होते. त्याचवेळी भरधाव वेगाने येणाऱ्या कारने महेंद्र यांच्या कुटुंबीयांना चिरडले.
या अपघातात महेंद्र यांचे काका पप्पू जाटव (५०), त्यांची पत्नी राजाबेटी आणि दोन मुली पूनम, रेश्मा आणि महिला नातेवाईक जागीच ठार झाले. तर दूरवर बसल्यामुळे महेंद्र यांचा जीव वाचला.
महाराष्ट्रात प्राचीन तलावाच्या खोदकामात सापडले दुर्मिळ पंचमुखी शिवलिंग, पाहा PHOTOS