Photos- जे कोणाला जमलं नाही ते करण जोहरने करून दाखवलं
साऊथचा तडका

या पार्टीत साऊथचे विजय देवरकोंडा, रश्मिका मंदाना, पूजा हेगडे उपस्थित होतेच. बाहुबली फेम तमन्ना भाटियाही आली होती. तमन्ना भाटियानं पिंक आउटफिट घातला होता. तर पूजा हेगडे गोल्डन परी होऊन आली होती.

रश्मिकाची दिलखेच अदाकारी
करण जोहरच्या या पार्टीत रश्मिका मंदाना आली, तेव्हा सगळ्यांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या होत्या. तिचं स्माइल सगळ्यांनाच आकर्षित करत होतं. रश्मिका मंदाना खूपच सुंदर दिसत होती. विजय देवरकोंडा ब्लॅक सुटाबुटात होता.

बाॅलिवूड स्टार्सची मैफल
करण जोहरचा ५० वा वाढदिवस सगळ्यांनीच साजरा केला. कारण करण सगळ्यांचा मित्र आहे. त्याचे फक्त व्यावसायिक संबंध रहात नाहीत. तर तो प्रत्येकाच्या कुटुंबाचा एक भाग होऊन जातो. या पार्टीत राणी मुखर्जीपासून सलमान खान, काजोल, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, कतरिना कैफ, विकी कौशल, अनन्या पांडे, जाह्नवी कपूर, गौरी खान, ट्विंकल खन्ना, जूही चावला, रवीना टंडनपासून शनाया कपूरपर्यंत सर्वच जण होते. करणचा जवळचा मित्र शाहरुख खान आणि त्याचं कुटुंबही होतंच. तर आमिर खान, किरण राव यांचीही उपस्थिती होती.
करण जोहरच्या पार्टीत किरण रावसोबत जाणं आमिरला पडलं महाग, नक्की काय घडलं?