बीड : बायकोच्या भावांना अडकवण्यासाठी एका 30 वर्षीय तरुणाने भलती शक्कल लढवत खुनाचा गुन्हा केला. बीड जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी केलेल्या तपासानंतर खुनामागचं कारण समोर आलं. ते ऐकून पोलिस देखील चक्रावले आहेत.

6 मे रोजी बीडच्या शिरूर तालुक्यातील आनंदगावात एका 65 वर्षीय वृद्ध व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. त्यांच्यावर झोपेतच हल्ला करत खून करण्यात आला होता. तर दुसऱ्या घटनेत खांबालिंबा शिवारात घरासमोर झोपलेल्या व्यक्तीला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

वीस लाखांची घरफोडी करून चोरटे पसार; टीव्हीवर ‘I Love You’ लिहून गेले अन् मग…
या दोन्ही ठिकाणी आढळून आलेल्या चिठ्ठीत आरोपीने दुसऱ्याच इसमांची नावे टाकली होती. त्यांना अटक न केल्यास खुनाचे सत्र पुढे असंच सुरू राहील, म्हणत पोलिसांना आव्हान दिले होते. वीस दिवस पोलिसांना चकवा दिल्यानंतर अखेर पोलिसांनी या आरोपीला वर्ध्यातून अटक केलीय.

सरकल्या उर्फ भगवान पुस्तक्या चव्हाण (वय 30 वर्ष, रा. तागडगाव ता. शिरूर कासार जि. बीड) असं पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ऊसतोड कामगार असणाऱ्या आरोपी सरकल्याचं गेल्या काही वर्षांपूर्वी लग्न झालं. मात्र काही कारणामुळे आरोपी सरकल्या आणि त्याच्या बायकोच्या भावांमध्ये वाद झाला. यादरम्यान बायको देखील माहेरी होती.

दारं-खिडक्या बंद, घरात विषारी गॅस, गेटवरच सुसाईड नोट; रहस्यमय घरात आई आणि मुलींची सामूहिक आत्महत्या
या वादामध्ये आरोपी सरकल्याला बायकोच्या 5 भावांनी मारहाण केली होती. याचा राग मनात धरून आणि बायकोच्या भावांना अडकवून अद्दल घडवण्यासाठी, आरोपी सरकल्याने नामी शक्कल लढवली आणि निरपराध असणाऱ्या वृद्ध व्यक्तीवर हल्ला करत त्याचा खून केला. यानंतर त्याने घटनास्थळी बायकोच्या भावंडांची नावे टाकून चिठ्ठी देखील सोडली.

पोलिसांनी आतापर्यंत जवळपास 20 ते 25 संशयितांना ताब्यात घेत चौकशी केली होती. अखेर पोलिसांनी 20 दिवसाच्या अथक परिश्रमानंतर आरोपी सरकल्याला वर्धा जिल्ह्यातून अटक केलीय. दरम्यान आरोपी हा अशिक्षित असून त्याला लिहिता वाचता येत नाही. त्यामुळे या खुनामागे नेमकं कोणा कोणाचा हात आहे ? याचा तपास आता बीड पोलिस करत आहेत.

टोमॅटोचे भाव शंभरी पार; तरी, शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here