Sambhajiraje Chhatrapati press conference | संभाजीराजे छत्रपती यांना कोणत्याही प्रमुख राजकीय पक्षाने पाठिंबा न दिल्यामुळे मराठा संघटना आक्रमक झाल्या होत्या. शिवसेनेकडून सहाव्या जागेसाठी संजय पवार यांनी अर्ज दाखल केल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळण्याच्या आशा पूर्णपणे संपुष्टात आल्या होत्या. त्यामुळे गेल्या काही तासांमध्ये संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा संघटनांच्या समन्वयकांशी चर्चा केल्याची शक्यता आहे.

हायलाइट्स:
- महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यापैकी कोणीही संभाजीराजे यांच्या अपक्ष उमेदवारीला पाठिंबा देण्यास नकार दिला
- संभाजीराजे छत्रपती यांची चांगलीच कोंडी झाली
संभाजीराजे छत्रपती यांना कोणत्याही प्रमुख राजकीय पक्षाने पाठिंबा न दिल्यामुळे मराठा संघटना आक्रमक झाल्या होत्या. शिवसेनेकडून सहाव्या जागेसाठी संजय पवार यांनी अर्ज दाखल केल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळण्याच्या आशा पूर्णपणे संपुष्टात आल्या होत्या. त्यामुळे गेल्या काही तासांमध्ये संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा संघटनांच्या समन्वयकांशी चर्चा केल्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती आजच्या पत्रकारपरिषदेत काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. ते शिवसेनेवर आगपाखड करणार किंवा अपक्ष म्हणून रिंगणात उतरून आव्हान निर्माण करणार का, हे पाहावे लागेल.
संभाजीराजे माघार घेण्याची शक्यता अधिक
राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन अपक्ष लढण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेले संभाजीराजे छत्रपती आता निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याची दाट शक्यता आहे. भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणीही पाठिंबा न दिल्याने संभाजीराजे यांच्यावर न लढताच माघार घेण्याची नामुष्की ओढावली आहे. एवढेच नव्हे तर राज्यसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करून घेण्यासाठी लागणारे १० आमदारांचे अनुमोदनही संभाजीराजे छत्रपती यांना जमवता आलेले नाही. अर्ज भरताना ही परिस्थिती असेल तर प्रत्यक्ष निवडणुकीतही संभाजीराजे यांना कितपत पाठिंबा मिळेल, याबाबत साशंकताच आहे. त्यामुळेच संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेण्याचे निश्चित केल्याची चर्चा आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
Web Title : rajyasabha election 2022 sambhajiraje chhatrapati will declare is he contest election or not may target shivsena
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network